भिवंडी दि.१( गांवकरी TODAY NEWS ) ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी, भिवंडी शहरात वीज पुरवठा आणि बिल वसूल करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीने शनिवार, ०२ सप्टेंबर आणि रविवार ०३ सप्टेंबर २०२३ रोजी गोपाळ नगर येथील पाटीदार हॉलमध्ये भव्य ग्राहक सेवा शिबिर “संवाद” आयोजित केले आहे.टोरेंट पावर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदनिया यांनी वीज ग्राहकांना आवाहन केले आहे की, या भव्य शिबिरात सलग दोन दिवस सकाळी १० वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत टोरेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्राहकांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यात येईल.वीज ग्राहकांनी या संवाद शिबिरात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
