भिवंडी तालुक्यातील हजारो आदिवासी कुटुंबीयांना शासनाने अनुसूचित जमाती व अन्य पारंपारिक वन हक्क अधिनियम यानुसार हजारो दावे मंजूर करून तहसीलदार कार्यालया कडून वन हक्क दावे मंजूर करून जमिनीचे प्लॉट आदिवासी कुटुंबियांच्या नावे केले आहेत.परंतु अजून त्या जमिनींचे मोजणी नकाशे भूमी अभिलेख कार्यालयाने दिले नसल्याने श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भिवंडी शहरातील भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालया बाहेर शेकडो आदिवासी स्त्री पुरुषांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले.आदिवासी प्लॉट धारकांना भूमी अभिलेख विभागाने तात्काळ जमीन मोजणी नकाशे द्यावेत ही मागणी लावून धरली होती.
