भिवंडी दि.३० ( गांवकरी TODAY NEWS ) शहरातील कापआळी येथील बरफगल्ली आंगणवाडीत रक्षाबंधनाचा कार्यक्रम पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी अंगणवाडीतील मुलेमुली उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.एकात्मिक बालविकास प्रकल्प भिवंडी पश्चिम विभागांतर्गत बिट क्र.६ अंतर्गत कापआळी येथे आंगणवाडी क्र.१३७ बरफगल्ली येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम सीडीओपी रंजना कंकाळ व मुख्यसेविका प्रतिभा वीर यांच्या मार्गदर्शनाने अंगणवाडी सेविका सुनीता कुंभार आणि मदतनीस मंगला रावसकर यांनी घेतला.याप्रसंगी अंगणवाडीतील मुलांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलामुलींनी उस्फुर्तपणे सहभागी होऊन रक्षाबंधन कार्यक्रमाचा आनंद घेतला.