वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भिवंडी


भिवंडी दि.२८ ( गांवकरी TODAY NEWS ) ठाणे – नाशिक वाहिनीवरील रांजणोली गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली असता,झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.राम दगडू म्हात्रे (५० रा.गुंदवली) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर या अपघात प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत राम म्हात्रे हा २६ ऑगस्ट रोजी ठाणे – नाशिक वाहिनीवरील रांजणोली गावच्या हद्दीतील अतिथी लॉजसमोरुन दुचाकीने जात असताना त्याच्या पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून रामच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.त्यावेळी अपघात होऊन दुचाकीस्वार तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.दरम्यान अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे.तर या घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनाकरिता येथील रुग्णालयात पाठवला आहे.या अपघाताची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मयत राम म्हात्रे यांचे चुलते अक्षय दिलीप म्हात्रे याच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात भादविच्या ३०४(अ),२७९ न्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या घटनेचा पुढील तपास पोऊनि निलेश वाडकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *