भिवंडी पंचायत समिती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये काम करणाऱ्या गटप्रवर्तक आदिवासी महिलेस जातीवाचक शब्द वापरून अपमान केल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्यसह ग्रामीण आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार ८ जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा परिषद सदस्य कुंदन पाटील, बाल विकास अधिकारी डॉ. स्वाती बाजीराव पाटील, भिवंडी पंचायत समिती मधील बीसीएम मयुरी मलबारी, जिल्हा परिषद ठाणे येथील डीसीएम स्वप्नाली मोहित, दर्शना हरिदास मढवी,सरिता हनुमान पाटील,सुनंदा बाळाराम म्हात्रे, अंजली देवेंद्र पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दैवती दयाळ गांगुर्डे ह्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत गटप्रवर्तक असून त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा वर्करचे काम पाहत होते.दरम्यान माहे २०२१ जून ते १३ जाने. २०२३ दरम्यान त्यांनी दर्शना मढवी,सरिता पाटील, सुनंदा म्हात्रे, अंजली पवार यांना शासकीय काम सांगितले असता त्यांनी तू आदिवासी खालच्या जातीची आहेस आम्ही तुझे काम ऐकणार नाही,असे बोलल्या. तर त्यांच्या बाटलीतील पाणी दैवती गांगुर्डे यांनी प्यायले असता तू आदिवासी खालच्या जातीतील असून आमच्या बाटलीतील पाणी का प्यायली ? असे बोलून अपमान केला. तर पंचायत समितीच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी जि.प.सदस्य कुंदन पाटील यांनी बोलावून जातीयवाचक शब्द वापरून अपमान केला. त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी देखील अपमान केल्याची तक्रार दैवती गांगुर्डे यांनी मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी नारपोली पोलीस ठाण्यात केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी कोणासही अटक केली नाही.या घटनेचा पुढील तपास पश्चिम विभागाचे सहा.पोलीस आयुक्त खैरनार करीत आहेत.बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS भिवंडी
