पडघा दि. १८ (गांवकरी TODAY NEWS ) वृतसंकलनासाठी फिरणाऱ्या पत्रकारांचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी भिवंडी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारानां रेनकोट छत्रीचे वाटप करण्यात आले.

भिवंडी पत्रकार संघाची सर्वसाधारण बैठक मुंबई नाशिक महामार्गावरील ओम साई हॉटेल तळवली नाका येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी पडघा खडवली महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थी व स्थानिक नागरिकांचा जीव गमावलेला होता त्यांना श्रद्धांजली देऊन विविध विषयांवर चर्चा करून ठराव संमत करण्यात आले यावेळी उपस्थित पत्रकारानां संघाच्या अध्यक्षा पत्रकार कुसुमताई देशमुख (पुण्य नगरी) व सचिव राजेश दळवी (दैनिक सकाळ, महानगरी टाईम्स) यांच्या हस्ते रेनकोट व छत्रीचे वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार राजेंद्र काबाडी (साप्ताहिक चक्रगती) दिपक हीरे (दैनिक सकाळ, दिनमान, चौफेर संघर्ष) सिद्धार्थ कांबळे (इ. टीव्ही भारत न्युज) सुमीत घरत (दैनिक पुण्य नगरी, पुढारी, नव शक्ती) अनिल गजरे (गांवकरी TODAY NEWS चॅनेल) भुपेद्रं आंबवणे वृत्त संध्या न्युज चॅनेल अमृत शर्मा (संडे टु संडे न्युज चॅनेल) विनोद पाटील (दैनिक लोकमत) आदी पत्रकार उपस्थित होते.

यावेळी आमदार शांताराम मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णु चंदे महीला आघाडी तालुका प्रमुख (ठाकरे गट) फशीताई पाटील पडघा ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल बिडवी यांनी संघास सदीच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
