डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील फायदेशीर.

लेख



🙏 आय फ्लू किंवा डोळ्यांचा संसर्ग म्हणजे काय? डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील? जाणून घेऊयात याबद्दल माहिती.

*🙏 आय फ्लू म्हणजे काय?* आय फ्लू हा डोळ्यांना होणारा संसर्ग आहे. याला कंजंक्टिवायटिस पिंक आय असेही म्हणतात. सामान्य भाषेत याला डोळे येणे असंही म्हणतात.

*🙏 डोळ्यांचा संसर्ग दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय -*

*● मध :* मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. त्यामुळे मधाच्या पाण्याने डोळे धुतल्याने डोळ्यातील जळजळ आणि वेदना मधाच्या पाण्याने लवकर दूर होतील.

*● गुलाबपाणी :* गुलाब पाण्यामध्ये अँटीसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. यामुळे संक्रमण करणाऱ्या जंतूंशी लढण्यास मदत होते. यासाठी फक्त गुलाब पाण्याचे 2 थेंब डोळ्यात टाका.

*● बटाटा :* बटाट्यामध्ये कूलिंग इफेक्ट असल्याने डोळ्यांच्या संसर्गामुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो. यासाठी बटाट्याचे गोल काप 10-15 मिनिटे डोळ्यांवर ठेवा.

*● तुळशी :* तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळशीची काही पाने पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी यातील तुळशीची पानं गाळून या पाण्याने डोळे धुवा.

*🙏 अर्थात डोळ्यांमधील इन्फेक्शन वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे उपाय करावे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *