मेरी माटी मेरा देश भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा उपक्रम..

भिवंडी


मेरी माटी मेरा देश उपक्रमात पंचप्रण शपथ घेण्यात आली, तर स्वातंत्र्यवीरांना केले अभिवादन ..


भिवंडी : ९ ( अनिल गजरे ) केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे माझी माती, माझा देश अंतर्गत भिवंडी महापालिकेत मुख्यालयात आज 9 ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून .पंचप्रण शपथ घेण्यात आली प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ दिली.या उपक्रमाचा एक भाग म्हणून या आपल्या शहरातील मातीस नमन ही मध्यवर्ती संकल्पना लक्षात घेऊन माती हातात घेऊन तसेच मातीचे रूप म्हणून प्रज्वलित दिवा हातात घेऊन पंचप्रण शपथ घेण्यात आली.

तसेच सर्व प्रभाग कार्यालयातून प्रभाग अधिकारी यांनी प्रभागातील कर्मचारी यांना शपथ दिली. तसेच पालिकेचे अन्य विभागात देखील शपथ घेण्यात आली. तसेच शाळेतून येणारी माती भरून आलेले अमृत कलश पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले, सदर माती ही कलशात जमा करून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देशाची राजधानी दिल्ली येथे अमृत वाटिका तयार करण्यासाठी ही माती वापरण्यात येणार आहे. .या पंचप्रण शपथ या कार्यक्रमानंतर स्वातंत्र्य चळवळीतील शहीद झालेले स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मा यांना हुतात्मा स्मारक येथे पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन अभिवादन केले.

यावेळी
पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके , उपायुक्त सचिन माने, प्रभारी उपायुक्त प्रणाली घोंगे, नगर रचनाकार अनिल येलमाने , शहर अभियंता सुनील घुगे, उद्यान अधीक्षक निलेश निलेश, संकेत सर्व प्रभागाचे प्रभाग अधिकारी अन्य अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS भिवंडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *