जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३

ठाणे



जिल्हा परिषद ठाणे च्या आस्थापनेवरील गट – क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर लिंक उपलब्ध देण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषद ठाणे वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावरील लिंकवर भेट देऊन दि. ५ ऑगस्ट २०२३ पासून ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज भरण्यात यावे असे आवाहन जिल्हा निवड समितीने केले आहे.

वेबसाईटवरील दिलेल्या लिंकवर व जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परिक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी सर्व आवश्यक बाबी या https://zpthane.maharashtra.gov.in/ व जिल्हा अधिकारी कार्यालयाकडील thane.nic.in संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *