आजाराने ग्रस्त पतीसह दोन मतिमंद मुलींचा सांभाळ करणाऱ्या ‘माऊली’ला समाजाकडून मदतीची अपेक्षा

भिवंडी


भिवंडी दि.२ ( अनिल गजरे ) महागाईमुळे या कुटूंबाचे जगणे कठीण झाल्याने आजाराने ग्रस्त पतीसह दोन मतिमंद मुलींचा सांभाळ कसा करावा असे संकट या ‘माऊली’ पुढे उभे राहिल्याने तिने समाजाकडून मदतीची अपेक्षा केली आहे. विशेष म्हणजे गेल्या २५ वर्षांपासून आजाराने ग्रस्त पतीसह दोन मतिमंद मुलींचा सांभाळ करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या ‘माऊली’चा विदारक व्हिडिओ समोर आला आहे.

ही माऊली भिवंडी तालुक्यातील जु नांदूरखी – टेंभवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या टेंभवली गावात राहणारी असून या माऊलीच्या कुटूंबाची विदारक व्यथा पाहून भिवंडीतील साई फाऊंडेशनने गेल्या आठ वर्षापासून मदतीचा हात देत, दरमहा धान्यसह जीवनावश्यक वस्तू घरपोच देऊन मानवता धर्म पाळत आहे. आता मात्र पती आणि तरुण गतिमंत मुलींवरील औषध उपचार आणि त्यातच गगनाला भिडलेल्या महागाईमुळे आता या कुटूंबाने एकट्या माऊलीच्या जीवावर दर दिवसाचे संघर्षमय जीवन जगावे कसे ? असा सवाल नातेवाईकांनीही उपस्थित करून समाजाकडून मदतीसाठी याचना केली आहे.भिवंडी तालुक्यातील टेंभवली गावात चंद्राबाई गुरुनाथ ठाकरे ह्या आजाराने ग्रस्त पती आणि मोनिका गुरुनाथ ठाकरे.(२०), पुनम गुरुनाथ ठाकरे (२०) या दोन गतिमंद मुलींसह राहतात. चंद्राबाई विवाह गुरुनाथ ठाकरे यांच्याशी ४५ वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर काही वर्षात तीन मुलींना या दांपत्याने जन्म दिला. यापैकी एका मुलीचा विवाह झाला. परंतु दोन मुली गतिमंद आणि घरात अठराविश्व दारिद्र असतानाच माउलीचे पती २० वर्षापासून अंथरूणावर खिळून आहेत. तेव्हापासूनच चंद्राबाईच्या जीवनात कुटूंबासाठी रोजचा जगण्याचा संघर्ष सुरू झाला. त्यातच चंद्राबाई शेतात मजुरी करूनही दोन वेळेच जेवणही या कुटूंबाच्या नशिबी नव्हते.अशातच या कुटूंबाची व्यथा साई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप वासू शेट्टी यांना माहिती मिळताच त्यांनी मदतीचा हात देत गेल्या आठ वर्षांपासून अन्नधान्यसह इतर जीवनाश्यक वस्तू घरपोच पुरवत आहेत. त्यामुळे या कुटूंबाचा पोटापाण्याचा प्रश्न तर सुटला, मात्र यापुढचा येणारा काळ कठीण असल्याचे पाहून चंद्राबाई यांचा नातेवाईक गणेश याने आगरी समाजाच्या दानशूर व्यक्तीसह समाजातील विविध संघटनेकडे मदतीसाठी याचना केली आहे.विशेष म्हणजे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात आगरी समाजात हजारोंच्या संख्येन दानशूर व्यक्ती आहेत. तर शेकडो आगरी समाजाच्या विविध संघटनासह संस्था आहेत. यामधीलच कोणी दानशूर अथवा संस्थेने मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा गणेश ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यामातून समाजासमोर मांडली आहे.
मदतीसाठी संपर्क साधा.9730350500

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *