ठाणे, दि.३० ( गावंकरी TODAY NEWS ) रोजी समता विचार प्रसारक संस्थेच्या ३१व्या वर्धापनदिनानिमित्त “एकलव्य गौरव पुरस्कार” कार्यक्रम नंतर पहिलाच कार्यक्रम एकलव्य विद्यार्थांसाठी आयोजित केलला गेला. “भातलावणी” ठाणे शहराजवळच असलेल निर्सगरम्य वातावरणात येऊर येथील यंदाची एकलव्य विद्यार्थी साधना टोकरे यांच्या शेतात भात लावणीचा कार्यक्रम संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांच्या अध्यक्षखाली पार पडला. त्या बोलताना म्हणाल्या संस्था प्रत्येक वर्षी वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा हिताचे वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन नेहमी करत असते पण यावर्षी भात लावणी आणि शेती कामाचा अनुभव मिळवा या हेतूने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमात ७० हुन अधिक एकलव्यांना आपले नाव नोंदणी केली त्यातील प्रत्यक्ष ६० एकलव्य विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता या अगोदर ही वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व विविध कार्यक्रम राबिवले आहेत. ह्या कार्यक्रमाचे संयोजन करीना साऊद , येनोक कोलियार , दर्शन पडवळ यांनी केले. कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा तसेच भातलावणीचे महत्व ?, कधी पासून सुरुवात झाली ?, कोणी केली ?, तसेच सध्या भात लावणी ही कमी प्रमाणत का होते ? ह्या विषयी माहिती कार्यक्रम संयोजिका करीना साऊद व साजणा टोकरे हिने करून दिली. तसेच ठाण्यात कधी पासून शेती केली जाते ?व कशी केली जाते ?, त्याच्या कालावधी कधी असतो ? ह्याची माहिती एकलव्य विद्यार्थिनी साजणा टोकरे हिने दिली. त्यानंतर साने गुरुजींची प्रार्थना खरा तो एकची धर्म ही प्रार्थना बोलून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. व ज्यांनी ह्या कार्यक्रमाला मदत केली व परवानगी दिली असे लक्ष्मण टोकरे व सहकुटुंब परिवार ह्यांना संस्थेच्या प्रथे प्रमाणे खादीच्या रुमाल व सफाई कर्मचाऱ्यांचे पुस्तक देऊन संस्थेचे सचिव अजय भोसले ह्यांनी आभार मानले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येऊर येथील कार्यकर्ते दिव्या घुले, शीतल, प्रतीक्षा भुरकुट, गौरी, सुशांत जगताप तसेच उपाध्यक्ष सुनील दिवेकर व हितचिंतक विजय मोहिते हे सहभागी झाले होते. तसेच आदी कार्यकर्त्यांनी अर्थक परिश्रम घेऊन भातलावणी उपक्रम यशस्वी रित्या पार पाडले.