अंबाडी दिं. १६. ( गावकरी TODAY NEWS ) शिवसेनेत सर्वात मोठे पद हे शिवसैनिकच आहे, एकनिष्ठ शिवसैनिकच भर सभेत पदाधिकारीऱ्यांना जाब विचारू शकतो. हे धैर्य आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारमुळे येत असून एकनिष्ठ शिवसैनिक हीच आमची ताकद आसून. यापुढील. निवडणूका देखील आम्ही या ताकदीने जिंकू असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते विजय कदम यांनी दुगाड फाटा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या एक दिवसीय पदाधिकारी शिबिरात केले आहे.

दुगाड फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या परिसरात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एक दिवशीय पदाधिकारी सोहळ्याचे नियोजन भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख माजी आ. रूपेश म्हात्रे. व ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख विश्वास थळे यांच्या. सुचनेनुसार गणेशपुरी जिल्हा परिषद गटाचे उपतालुका प्रमुख अंनता शेलार, व शिवसेनेचे सहकार विभाग तालुका प्रमुख संजय पाटील यांनी केले होते
. शिवसेनेची स्थापना मुळातच अन्यायाच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी झाली असून पळपूट्या चाळीस आमदार, व तेरा खासदारामुळे नवीन आमदार खासदार निवडून आणण्याची संधी आपल्याला मिळाली आहे त्या मुळे आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकी करिता जोमाने कामाला लागा व गनिमी काव्या ने निवडणुका जिंका असा सल्ला व सूचना मार्गदर्शन पर भाषणात उपनेते विजय कदम यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.आहे
या प्रसंगी शिवसेनेचे ठाकरे गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख विश्वास थळे, उपजिल्हा प्रमुख इरफान भुरे, तुळशीराम पाटील, प्रकाश भोईर, तसेच महिला आघाडी सम्पर्क प्रमुख विद्या साळी, महिला आघाडी जिल्हा संघटिका रश्मी निमसे, उपजिल्हा संघटिका कविता भगत, जेष्ठ नेते कुर्ष्णकांत कोंडलेकर, सोन्या पाटील, कुष्णा वाकडे, युवा सेनेचे अल्पेश भोईर, पालघर जिल्हा संपर्क प्रमुख निलेश गंधे, शहापूरचे काशिनाथ तिवरे, आदी पदाधिकारी सह भिवंडी, वाडा, शहापूर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
या एकदिवशीय पदाधिकारी मार्गदर्शन शिबिरास आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास थळे, इरफान भुरे, अरूण पाटील. अल्पेश भोईर आदींनी निडणुका जिकण्या च्या दृष्टीने बूथ प्रमुख, मतदार याद्य, व्हाटस ऐप गृप, माहिती पत्रके, आदी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी भरपावसात देखील तिन्ही तालुक्यातील शिवसेनेचे ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.