—————————————-
बद्धकोष्ठता- शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे गुदद्वारावर जोर द्यावा लागतो.
*मूळव्याधाची कारणे काय आहेत*
१. बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे २. शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे
३. गर्भधारणेदरम्यान – गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते
4. प्रसूतीनंतर – प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते.
५. चुकिची आहार पध्दति- फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन
६. बराच काळ एका जागी बसून राहणे.
७. लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे
८. अनुवंशिकता
९. अतिमांसाहार, अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते.
*मूलळव्याधाची लक्षणे –*
शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना
शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे
गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे – आव पडणे.
गुदभागी कोम्ब-मोड-कुडी-गाठ येणे.
पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहते.
अॅनिमिया- मुळव्याधीमध्ये रक्त-स्राव झाल्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते या अवस्थेला अॅनिमिया असे म्हणतात.
भूक मंदावणे – शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्त-स्राव होतो या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लाग़तो. परंतु याचा तोटा जास्ती होतो, कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते तसेच मुळव्याधीचा त्रासही वाढतो.
रुग्णाचे वजन कमी होते.
मुळव्याधीच्या सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.
*मूळव्याधावरती घरगुती उपचार –*
हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात.अॅलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे.
आयुर्वेदिक उपाय :
आता जे कोणी घरगुती उपाय करू शकत नाहीत किंवा ज्यांच्याकडे वेळेचा अभाव आहे अशा लोकांसाठी आम्ही आयुर्वेदिक Piles/ Fissure Churn/मुळव्याध/फिशर चुर्ण तयार केले आहे. ज्याच्या नियमित वापराने तुम्ही कायमचे मुक्त होऊ शकता.
1 चमचा चुर्ण 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर एका तासाने घेणे
या चूर्ण मध्ये सर्व घटक हे संपूर्ण नैसर्गिक आहेत हे योग्य प्रमाणात वापरण्यात आले आहेत.
पथ्य:- जास्त तिखट, तळलेले पदार्थ,मासे,अंडी,छोले, मटार,राजमा, उडदाची डाळ, चिकन, धूम्रपान,दारु बंद करणे
*************************
: *आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.*
*************************
