बारामती : (गावंकरी Today News नेटवर्क ब्यूरो रिपोर्टर रियाज पठाण.) बारामती येथे कर्मवीर पतसंस्था गुणवडी या कार्यालयाचे भव्य असे नूतनीकरण करून,या कार्यालयाचे उद्घघाटन जेष्ठ संचालक मा.भारत बापू गावडे व मधुकर होले यांच्या शुभ हस्ते दिनांक- २६/०६/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.

याप्रसंगी पतसंस्था संचालक धनंजय अण्णा वाबळे,उपाध्यक्ष निलेश बोरावके,कल्याण पाटील,छगन आटोळे,व शंकर पतसंस्था व्यवस्थापक काळे सर ,व सर्व संचालक,कर्मचारी, सभासद वर्ग उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. स्नेहा भापकर यांनी केले व याप्रसंगी धनंजय वाबळे, कल्याण पाटील ,भारत बापू गावडे यांनी मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार संचालक धोंडीराम पवार सर यांनी मानले.