भिवंडी : दरवर्षीप्रमाणे भिवंडी शहरामध्ये मुस्लिम बांधवांची बकरी ईद यंदाही साजरी करण्याच्यादृष्टीने पोलिस व महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे .त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे भान राखून आपण सर्वांनी यंदाची बकरी ईद आनंदामध्ये साजरी करा, असे आवाहन पोलिस विभागाच्यावतीने पोलिस उपायुक्त, परि २ नवनाथ ढवळे यांनी भिवंडीतील बैठकीस उपस्थित असलेल्या मुस्लिम धर्मिय बांधवांना केले. यावेळी महापालिकेचे उप-आयुक्त (आरोग्य) दीपक झिंजाड उपस्थित होते.

बकरी ईदनिमित्त भिवंडी पोलिस संकुल येथे नुकताच आयोजित केलेल्या संयुक्तिक बैठकीत बोलतांना ते पुढे म्हणाले की, भिवंडी शहरातील गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार आणि मा. मुंबई उच्च न्यायालयातील क्रिमिनल जनहित याचिका (एल) नं. ११०३८-२०२१ मधील दिलेल्या मार्गदर्शक निर्देशानुसार आपण सर्वांनी हा सण आनंदात साजरा करायचा आहे आणि शहरातील सलोख्याचे वातावरण कोणत्याही परिस्थितीत गढूळ होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. त्यांनी पुढे असेही सांगितले की, पोलिस, वाहतुक आणि महानगरपालिकेच्या अटी, शर्तीना अधिन राहून परवानगी प्राप्त कुर्बानी सेंटरवर स्वच्छता राखणे अपशिष्टे एकत्रित करून उचलण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरीही या सेंटरवरील संबंधित व्यक्तीनी यामध्ये वैयक्तिक सहभाग घेऊन येथील स्वच्छतेची तितकीच जबाबदारी नागरीक म्हणुन आपणांसारख्याचीही राहणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत अनाधिकृतपणे जनावरांची वाहतुक, महापालिका क्षेत्राच्या बाहेरील जनावरे व मांस पुरविण्यावर प्रतिबंध करण्यांत आलेला आहे. याच दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे अशा काही गंभीर घटना घडणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्यावी अन्यथा सबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात येतील असे त्यांनी शेवटी मार्गदर्शन करतांना म्हटले.
यावेळी महापालिकेच्यामार्फत मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अर्जदारांच्या मागणीनुसार तात्पुरत्या कुर्बानी सेंटरला दिल्या जाणा-या परवानग्या व त्यातील अटी शर्तींचे पालन संबंधितांनी करून, बकरी ईद हा सण आनंदामध्ये साजरा करण्यासाठी महानगरपालिकेने
जनावरांची अपशिष्टे उचलण्यासाठी मनुष्यबळ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, वाहतुकीसाठी विविध वाहने, औषध फवारणी पशु वैद्यकिय अधिका-यांची नियुक्ती, पावती फाडण्यासाठी आणि स्वच्छतेच्या कामावर जातीने लक्ष ठेवण्याकरीता महानगरपालिकेचे कर्मचा-यांची नियुक्ती तसेच संवेदनशिल तात्पुरत्या कुर्बानी सेंटरवर सीसीटिव्ही लावण्याची व्यवस्था करण्यांत आली आहे तसेच अपशिष्टांच्या वाहनांना वाहतुकीस मार्गही निश्चित करण्याची खबरदारी महापालिका घेणार असल्याने आणि याकामी मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे निश्चित केलेल्या धोरणानुसार प्रभागनिहाय तक्रार निवारण केंद्रांची स्थापना करण्यांत आलेली असून नागरीकांनी त्यासंबंधिच्या तक्रारी नोंदवण्याकरीता सहकार्य करावे आणि अशा सार्वजनिक सणांमध्ये शहर स्वच्छतेच्या कामांत प्रत्यक्ष सहभागी व्हावे असे सांगून महापालिका बकरी ईद साजरी करण्यास पुर्णपणे सज्ज झाली असल्याचे महापालिका उप-आयुक्त (आरोग्य) दीपक झिंजाड यांनी यावेळी उपस्थितांना माहिती देताना सांगितले आहे.
सदर संयुक्तिक आढावा बैठकीस शहरातील मुस्लिम धर्मिय बांधव कसाई, जनावरांचे व्यापारी, मशिदींचे मौलाना व ट्रस्टी, शांतता समिती सदस्य तसेच महानगरपालिका व टोरंट पॉवरचे अधिकारी उपस्थित होते, तर यानिमित्ताने शेवटी उपस्थितांचे आभार पश्चिम विभागाचे
सहाय्यक पोलिस आयुक्त, दिपक देशमुख यांनी मानले.
महापालिकेचे तक्रार निवारण केंद्र
तक्रारीचे ठिकाण
१) महानगरपालिका,
नवीन प्रशासकिय
इमारत (मुख्य आपत्कालीन कक्ष)
टोल फ्री क्रमांक – १८००२३३३११०२
(०२५२२) – २५००४९
२) प्रभाग समिती क्र. १
(आपत्कालिन कक्ष)
दुरध्वनी क्रमांक-
(०२५२२१) – २५०५२४
३)प्रभाग समिती क्र.२
(आपत्कालिन कक्ष)
(०२५२२) – २२३५५५
४) प्रभाग समिती क्र.३
दुरध्वनी क्रमांक-
(०२५२२)- २५००२५
५) प्रभाग समिती क्र.४
(आपत्कालिन कक्ष)
दुरध्वनी क्रमांक-
(०२५२२१) – २२३३३१
६) प्रभाग समिती क्र.५ (आपत्कालीन कक्ष)
दुरध्वनी क्रमांक-
(०२५२२१) – २५००३७