जव्हार-जितेंद्र मोरघा
जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने भारत देशामध्ये विविध राज्यांमध्ये जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तालुक्यामध्ये त्यापैकी मोखाडा तालुक्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोखाडा पंचायत समिती उपसभापती तसेच शिवसेना विक्रमगड विधानसभा संघटक प्रदीप वाघ यांनी आपले आरोग्य आणि सुदृढ निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक माणसाने सकाळी उठल्याबरोबर योगासना केले पाहिजे. माणसाने योग साधना केल्यावर आपली एकाग्रता, श्वासन श्वास, आपल्या शरीराच्या हालचाली वरती सर्व लक्ष केंद्रित असते.त्याचबरोबर तरुण आणि जास्तीत जास्त व्यायाम सुद्धा केला पाहिजे तरच आपले शरीर निरोगी आणि सुदृढ होईल असे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या समवेत योगासने प्रात्यक्षिके करून योगासनाचा महत्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.जिल्हा परिषद शाळ करोळ येथे सरपंच नरेंद्र येले यांनी देखील योगदिना बदल माहिती दिली,वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यां समवेत उपसरपंच नंदकुमार वाघ, यांनी योगासनाचा प्रत्यक्ष आंनद घेतला.उधळे शाळेत धनराज जाधव, संतोष पाटील सर यांनी योग दिन साजरा केला.
यावेळी करोळ शाळेचे मुख्याध्यापक साबळे सर,वाकडपाडा शाळेचे मुख्याध्यापक दिनकर सर , पोलिस पाटील विठ्ठल गोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा घोडेराव, शिक्षक निलेश गांगवे,शतानंद भेरे,श्याम फसाळे, सुरेश शिंदे,हर्षदा खादे, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
