जव्हार :(जितेंद्र मोरघा )जननायक बिरसा मुंडा यांच्या शहिद दिना निमित्त आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती च्या वतिने खोडाळा येथे भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की आदिवासी माणूस हा कायम संघर्ष करत असुन न्याय,हक्का साठी लढा देत आहे,हा लढा देण्यासाठी जननायक बिरसा मुंडा यांच्या उलगुलान चा नारा प्रेरणादायी ठरेल, क्रांतिकारक महापुरुषांच्या विचारातुन अन्याया विरुद्ध लढण्याचे बळ मिळते, प्रत्येक आदिवासी माणसाच्या घरात महापुरुषांच्या प्रतिमा असली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

करोळ ग्रामपंचायत चे सरपंच नरेंद्र येले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगवान बिरसा मुंडा यांचे योगदान मोलाचे आहे.
या कार्यक्रमास उपसभापती तथा आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चे अध्यक्ष प्रदीप वाघ
उधळे सरपंच लता वारे,करोळ चे सरपंच नरेंद्र येले, उपसरपंच नंदकुमार वाघ, पत्रकार गणेश वाघ, ग्रामपंचायत सदस्य गणेश खादे पांडुरंग वारे,युवराज गोंदके निलेश झुगरे, विष्णू हमरे, कृषी सहायक इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
