
भिवंडी दि.१( अनिल गजरे )भिवंडी शहरामध्ये पावसाळ्यात अर्धवट नाले सफाई केल्यामुळे पुराचे पाणी भरल्यास, आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित ठेकेदारांवर रोज पेनेल्टी करुन त्यांची बिले अदा न करता त्यांना काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्याची कारवाई करणेत येईल त्यासोबतच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करेल असा स्पष्ट इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी गुरुवारी प्रभाग क्षेत्रातील नाले सफाई करण्यात येत असलेल्या ठिकाणी अचानक भेट देवून दिला आहे.

या भेटीमुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांची यावेळी एकच धावपळ उडाली होती.प्रशासक तथा आयुक्त म्हसाळ यांनी प्रभाग समिती क्र. ३ व ४ च्या क्षेत्रातील गणेश टॉकीज, आरती हॉटेल, समाज मंदिर, धामणकर नाका रोडवरील टोरंट पॉवर कार्यालयाजवळील पाणी साठण्याचे ठिकाण, कमला हॉटेल, एव्हरग्रीन टॉवर येथील नाले सफाई तपासणी दौरा केला.

या दरम्यान त्यांनी मुख्य रत्यांवरील नाले, त्यांना जोडणारी गटारे (१०० मी. पर्यंत) पाऊस येण्याच्या आंत सफाईचे काम पुर्ण करुन नाले लगतची गटारे प्रवाहीत करावी, शहरातील प्रत्येक नाले-गटारातील पाण्याचा निचरा करणे आणि गटारांजवळ काढलेला व रस्त्यावरील कचरा, गाळ, माती इ. तात्काळ वाहतुक करुन उचलण्याची व्यवस्था करावी अन्यथा हाच कचरा किंवा गाळ पुन्हा नाले गटारांमध्ये जाऊन पाणी तुंबण्याची शक्यता असल्याचे सांगितले तसेच नाले मधून सायजिंग. डाईंग साठी बेकायदेशीर घेतलेल्या पाईपलाईन कट करून सायजिंग डाईंग मालकावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले असून..

अशा परिस्थितीमध्ये पुरसदृष परिस्थिती निर्माण झाली तर संबंधित ठेकेदारांवर महापालिका कारवाई केल्याशिवाय राहणार नाही.आणि व्यवस्थितपणे नाले गटार सफाईच्या कामाचा उरक मुदतीत न करणा-या ठेकेदरांचे काम समाधानकारक नसल्यास त्यांच्या बिलातून रक्कम कपातीबाबत तात्काळ तशा लेखी नोटीसा निर्गमित कराव्यात असा कडक इशारा यावेळी आयुक्तांनी दिला आहे.

अचानक नाले सफाई तपासणी दौ-यामध्ये आयुक्तांनी केलेल्या पाहणीमध्ये नागरीकांना तुटलेल्या चेंबर्स किंवा नाल्यांवरील तुटलेल्या स्लॅबमुळे अपघातासारख्या घटना होऊ नयेत याकरीता सदर ठिकाणी चेंबर्स आणि नाले स्लॅब दुरुस्तीला प्रथम प्राधान्याने करुन घेण्याचे निर्देश बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिले.तसेच यावेळी शहरातील गटारांमधून सायझिंग, डाईंगसाठी जाणा-या पाईप लाईन तात्काळ कट करुन संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हेही दाखल करण्याविषयी आयुक्तांनी सांगितले आहे.दरम्यान या दौऱ्यावेळी उपायुक्त (कर) दीपक झिंजाड,शहर अभियंता सुनिल घुगे,सबंधित प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे, आरोग्य विभागाचे प्रमुख जे. एम. सोनावणे, प्रभाग आरोग्य निरिक्षक, मुकादम आणि ठेकेदार उपस्थित होते. बिरो रिपोट गांवकरी TODAY NEWS भिवंडी
