अकलोली कुंड येथे हल्ला झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यु

भिवंडी



अंबाडी दिं. 02 : भिवंडी तालुक्यातील अकलोली कुंड या ठिकाणी रात्रीच्या सुमारास वैयक्तिक राग मनात ठेउन मित्रांच्या सहायाने एका तरुणावर जीवेघेना हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याची घटना नुकतीच गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती त्यात गंम्भीर जखमी झालेल्या तरुणाचा आज मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यु झाला त्यामुळे परिसरात शोककळा पसरली असून आरोपी वर गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की अकलोली कुंड येथील गावात राहणारा प्रणय. रविद गायकर हा रात्री च्या सुमारास अंघोळी साठी कुंडावर आला होता, त्यानंतर मोबाईल वर बोलत बसला, त्याच वेळी त्या ठिकाणी त्याच्यावर जुना राग असलेले वज्रेश्वरी येथील काही तरुण तिथे येऊन त्यास तू मला शिवीगाळ का करतोस? म्हूणन दोघांमध्ये बाचाबाची झाली त्या नंतर थांब तुला मी दाखवतो च आता असे म्हणून वज्रेश्वरी येथील साहिल खेडेकर, हरी धनसिंग नेपाळी,कृषीकेश भोसले, विराज क्षीरसागर, , यांच्या सह इतर दहा बारा जणांनी मोटर सायकल वर एकत्र येऊन त्यास एकटे गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता त्यात छाती वर व फुफुस, हृदय यावर संसर्ग व गंभीर रित्या मार लागल्याने त्याचवर मुबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते अखेर आज त्याची प्रकृती गंभीर होऊन मृत्यु झाला या प्रकरणी सर्व आरोपीना पोलिसांनी अटक करून या. प्रकरणामागे . आणखी फरार आरोपिंचा शोध घेत आहे यागुन्हाचा पुढील तपास गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके हे करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *