दि.30( अनिल गजरे )भिवंडी तालुक्यातील पडघा, बोरीवली आदी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (rain in bhivandi) झाला. वादळी वा-यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. दरम्यान भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात एका लग्न साेहळा सुरु असताना वादळी वारे आल्याने हाॅलचे छप्पर उडून गेले तर व-हाडी मंडळींच्या अंगावर पत्रा पडल्याने काही जण जखमी झाले.
भिवंडी तालुक्यातील पडघा, बोरीवली परिसरात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वा-यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने घरात पावसाचे पाणी साचले. तसेच घरांमध्ये साठवून ठेवले अन्न धान्य माेठ्या प्रमाणात भिजले.
या पावसामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे लाेकांची धावपळ झाली. त्यातच एका लग्न समारंभाच्या हाॅलचे पत्रे उडून गेले. तसेच काही पत्रे व-हाडी मंडळींच्या अंगावर पडले. त्यामुळे व-हाडी मंडळी जखमी झाले. दरम्यान जखमींवर जागेवरच उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
