गावंकरी Today News Network ब्युरो चीफ रिपोर्टर रियाज पठाण .
*बारामती* नंदुरबार तालुक्यातील काकरदे येथे दिनांक १२/०५/२०२३ रोजी ,वार शुक्रवार या दिवशी ठिक सकाळी ९:३० वा. मुख्य वस्ती परिसरातील खंडेराव मंदिर येथे ग्रामपंचायत काकरदे व्दारा ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ही ग्रामसभा ऐतिहासिक ठरली. महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांना संयुक्तपणे भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून ग्रामसभेत एकमताने ठराव संमत करण्यात आला. या ऐतिहासिक ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून सरपंच पुंडलिक मराठे/भापकर, हे होते तर या ऐतिहासिक ठरावाचे सूचक म्हणून उपसरपंच किरण मराठे हे होते. या ठरावाला अनुमोदन रविंद्र बागुल यांनी दिले.
महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीत खूप मोलाचे योगदान आहे. शैक्षणिक क्रांती, सामाजिक क्रांती, ही महात्मा फुले यांनी घडवून आणली. मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करणे, विधवा विवाहास प्रोत्साहन देणे, बालहत्या प्रतिबंध गृहाची निर्मिती, कृषक तसेच कष्टकरी च्या हितासाठी कार्य, सामाजिक समतेच्या निर्मितीसाठी कार्य करणे, भूमिपुत्रांच्या मध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर काव्य निर्मिती करणे, तसेच शोषण विरहित विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीसाठी राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व सावित्रीआई फुले यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या व्दारा संयुक्तपणे महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून ग्रामसभेत एकमताने ठराव संमत करण्यात आला.
ग्रामपंचायत काकरदे आदर्श भूमिकेसाठी व आदर्श संकल्पनांच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे.यापुर्वी ही वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व रूजवण्यासाठी ग्रामपंचायत व्दारा वाचन कट्ट्याचे लोकार्पण करण्यात आले आहे .विद्यार्थी विद्यार्थिनी साठी अभ्यासिका चालू करणे अशा विविध कारणांसाठी काकरदे ग्रामपंचायत तसेच सरपंच पुंडलिक मराठे प्रसिद्ध आहेत.या पुर्वी ही सामाजिक समतेच्या भूमिकेतून काकरदे येथे सरपंच पुंडलिक मराठे यांनी प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रेच्या वेळी पहिला नारळ अर्पण करण्याचा मान हा सकल आदिवासी समाजाला दिला होता. त्यांच्या या कृतीतून गावातील एकतेचे दर्शन घडविले होते.
फुले दांपत्याच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या व्दारा महात्मा जोतीराव फुले व सावित्रीआई फुले यांना संयुक्तपणे भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून ग्रामसभेत ठराव संमत करून ग्रामपंचायत काकरदे फुले दांपत्याच्या महान कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करित आहे. या मुळे ग्रामपंचायत काकरदे चे सर्वत्र कौतुक होते आहे.
