*
बारामती : गावकरी Today News Network ब्युरो चीफ रिपोर्टर रियाज पठाण. गुरूवार दि.११/०५/२०२३ रोजी कूरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मेडिकल ऑफिसर डॉ.माळी सर यांच्या उपस्थित बुधराणी हॉस्पिटल पुणे यांचे मोफत कॉम्पुटर मशीन द्वारे नेत्र तपासणी शिबिर पार पडले.यामध्ये एकूण ११३व्यक्तींची मोफत तपासणी करण्यात आली व १७ व्यक्तीचे मोतीबिंदू चे मोफत ऑपरेशन करण्यात येणारं आहे. व राहिलेल्या व्यक्तींना अल्प दरात चेष्मे वाटप करण्यात आले.शिबिराचे आयोजन अजित थोरात यांच्या सहकार्याने करण्यात आले.तसेच नेत्र चिकित्सक डॉ. मंजूर शेख यांचे देखील विशेष मार्गदर्शन सर्व ग्रामस्थांना यावेळी मिळाले.
