केसातील कोंडा, केस गळणे, टक्कल पडणे, केस पांढरे झाल्यास व केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय

लेख

आरोग्य विषयक माहिती.


👉डोक्यात कोंडा (Dandruff) झाल्यास :

पहिला प्रयोग : २५० ग्रॅम ताकात १० ग्रॅम गूळ घालून डोके धुतल्याने किंवा लिंबाचा रस लावून डोके धुतल्याने कोंडा नाहीसा होतो.

दुसरा प्रयोग : अर्धी वाटी दह्यात दोन चमचे हरबऱ्याच्या डाळीचे
पीठ (बेसन) घालून केसांच्या मुळाशी लेप करावा. २० मिनिटांनंतर
डोके धुवावे. कोंडा नाहीसा होऊन केस चमकदार होतील.

👉केस गळत असल्यास :

पहिला प्रयोग : ज्येष्टमधाचे चूर्ण माक्याच्या रसात वाटून लेप केल्याने किंवा सुकविलेल्या आवळ्यांचे चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून लेप केल्याने केस गळण्याचे थांबून काळे होतात.

दुसरा प्रयोग : आवश्यकतेपेक्षा अधिक भावनात्मक दबावामुळे केस अधिक गळतात. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन हॉरमोनच्या कमतरतेमुळे केस अधिक गळतात. आहारात लोहतत्त्व व आयोडीनच्या कमतरतेमुळेही केस अकाली गळतात.
दह्यात केसांना आवश्यक असणारी सर्व तत्त्वे असतात. एक कप दह्यात ८ ते १० मिऱ्यांची पावडर घालून डोके धुतल्याने डोके चांगले स्वच्छ होते. केस मऊ व काळे राहतात तसेच केस गळणे बंद होते. आठवड्यातून कमीतकमी एकदा अशा प्रकारे केस धुवावेत.

👉टक्कल पडणे :

पहिला प्रयोग : गुंजा, हत्तीच्या दातांची राख व रसवंती प्रत्येकी २ ते १० ग्रॅम घेऊन त्याचा लेप केल्याने ज्या ठिकाणचे केस गेले असतील त्या ठिकाणी पुन्हा केस उगवतात.

दुसरा प्रयोग : दही व मीठ समप्रमाणात एकत्र करून जेथे जेथे टक्कल पडले असेल तेथे रोज रात्री ४-५ मिनिटे मालीश केल्याने लाभ होतो.

👉केस पांढरे झाल्यास :

पहिला प्रयोग : लिंबोणीचे तेल दोन महिने लावल्याने व नाकात टाकल्याने किंवा तुळशीच्या १० ते २० ग्रॅम पानांबरोबर तेवढेच सुकविलेले आवळे वाटून, लिंबाच्या रसात मिसळून लावल्याने केस काळे होतात.

दुसरा प्रयोग : लोहभस्म, माका (भृंगराज), त्रिफळा व काळी माती हे सर्व पदार्थ एक महिनाभर उसाच्या रसात ठेवून लेप केल्याने, रोज रात्री केसांना गाईचे तूप लावून, पायाच्या तळव्यांना गाईचे तूप काशाच्या वाटीने थोडा वेळ घासल्याने तसेच उजव्या हाताच्या चार बोटांची नखे (अंगठा सोडून) डाव्या हाताच्या चार बोटांच्या नखांवर २-३ मिनिटे घासल्याने पांढरे केस काळे होतात.

तिसरा प्रयोग : केस अकाली पांढरे झाले असल्यास हत्तीचा दात, आवळा व माका (भृंगराज) यांचे तेल बनवून डोक्याला लावावे. तूप गरम करून त्याचे काही थेंब नाकात टाकावेत तसेच दिवसातून दोन वेळा त्रिफळा चूर्ण ज्येष्टमधाच्या चूर्णाबरोबर घ्यावे. जेवणानंतर एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून प्यावे तसेच सर्वांगासन व जलनेती करावी.

👉केसांच्या वाढीसाठी :

पहिला प्रयोग : स्नान करताना तिळाच्या पानांचा रस लावल्याने, ज्येष्टमध, आंवळा किंवा माका यांचे तेल लावल्याने, कारल्याचे मूळ किंवा मेथी पाण्यात वाटून लावल्याने, लिंबोणीचे तेल लावल्याने केस वाढतात.

दुसरा प्रयोग : वडाच्या जुन्या पारंब्या लिंबाच्या रसात उगाळून चांगल्या प्रकारे लेप करावा. अर्ध्या तासानंतर केस धुवावेत. नंतर खोबरेल तेल लावावे. असे तीन दिवस केल्याने केस गळणे बंद होते. केस लांब, काळे व मजबूत होतात.

👉डोक्यात ऊवा व लीखा झाल्यास :

पहिला प्रयोग : लिंबोणी, मोहरी किंवा मायफळाचे तेल
लावल्याने किंवा रीठ्यांचा फेस लावल्याने ऊवा व लीखा मरतात. दुसरा प्रयोग : तुळशीची पाने वाटून डोक्याला लावावीत त्यानंतर डोक्याला कापड बांधावे. सर्व ऊवा मरून कापडाला चिकटतील. केवळ २-३ वेळा लावल्याने सर्व ऊवा नाहीशा
होतील.

👉मुलायम केसांसाठी :

डोक्याला गोमूत्र लावून थोड्या वेळाने डोके धुतले असता तसेच मोहरीच्या तेलाने मालीश केल्याने केस मऊ होतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *