जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे बालसंस्कार वर्ग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

महाराष्ट्र


गावंकरी Today News Network ब्युरो रिपोर्टर रियाज पठाण बारामती.
बारामती:जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर येथे १० एप्रिल ते २५ मे या दीड महिन्याच्या कालावधीत शाळेत बालसंस्कार वर्ग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु झाले असून दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत हे शिबीर होत असून शाळा व्यवस्थापन, ग्रामपंचायत कांबळेश्वर, पालक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव सस्ते उपशिक्षिका सुनिता शिंदे,निर्मला खताळ, मनिषा चव्हाण या सर्वांच्या नियोजनातून
दररोज बाल संस्कार वर्गास १०० मुलांची उपस्थिती अतिशय छान सकाळच्या अल्हाददायी वातावरणात सकाळी ७ ते ८ या
वेळेत बाल संस्कार वर्ग मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे . पुढे येऊ न विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी जेणेकरून मुलांची भिती दूर होणेस मदत.विद्यार्थी आवडीनुसार विविध उपक्रमा ने सदर शिबीरास प्रारंभ झाला आहे.
सदर शिबीरात ह .भ.प.मिराताई रणवरे यांनी बाल वयात बालमनावर रुजवायच्या छोट्या छोट्या गोष्टी, सकाळची उठण्याची वेळ, थोरा मोठ्यांच्या, गुरुजनांचा आदर सन्मान, आई बाबांना करावयाची कामात मदत, ओंकार, ध्यान, गप्पा गोष्टी, विद्यार्थी आवडीचा गीतावरील डान्स आदि विषय अतिशय मनोरंजक पदधतीने घेतले . यामधून विद्यार्थ्यांना आनंदनिर्मीती बरोबर नव्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या . आवडीने या शिबीरात सहभाग नोंदवताना दिसून येते . योगा सर नाना चव्हाण आणि सुतार सर यांनी सदर बाल संस्कार वर्गात मुलांना योग अभ्यासाचे धडे सुरु केले असून बसरीका, अनुलोम मिलोम, पदमासन, शिर्षासन, मुक्त हालचाली आदी बाल गटास योग्य असा योगा अभ्यास सुरू आहे


त्यानंतर मुलांचे ८ ते ११ या वेळेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग पार पडत असून सदर वर्गात बाळासाहेब मोरे सर व तावरे मॅडम यांनी मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षा बेसिक तयारी पासून सर्व विषयांना सुरूवात केली असून दीड महिना कालावधीत जास्तित जास्त स्पर्धा परीक्षा घटक विविध क्ल्युप्त्या पटकन उत्तरे काढणेची पद्धती पाठांतर या बरोबरच इंग्रजी विषय तयारी या सर्व आवश्यक बाबी पूर्ण करून घेणेवर भर दिला जाणार आहे . शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय, सैनिक स्कूल मंथन आदि प्राथमिक स्तरावरील स्पर्धा परीक्षांची तयारी या शिबीरात करून घेतली जाणार आहे .


याबरोबरच मुलांना दोरी उड्या, लगोर, सुरपारंब्या, विटी दांडू, लपाछपी, मल्लखांब, टायर फिरवणे, गोट्या खेळणे आदि सर्व लुप्त पावत चाललेले जुने खेळ गावातील तरुण मंडळातील मुलांच्या सहाय्याने होत असून मुलांना जुन्या खेळांची माहीती व खेळण्यासाठी योग्य संधी निर्माण झाली आहे . या शाळेच्या उपक्रमातून जेणेकरून जुन्या संस्कृतीची ओळख यामधून विद्यार्थ्यांना होत आहे . मैदानी खेळाबरोबर शाळेत कॅरम, बुद्धिबळ, यासारखे वर्गातील बैठे खेळही घेतले जाणार आहेत . त्याचबरोबर तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने हस्ताक्षर सुधार, चित्रकला आदि बाबतही मुलांना मार्गदर्शन दिले जाणार आहे .
सदर बाल संस्कार शिबीरास शिरवली केंद्राच्या आदर्श केंद्रप्रमुख शोभा सावंत यांची या उपक्रमास भेट झाली . शाळेने सुरु केलेल्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या . जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारचे शिबीर आयोजन नसून कांबळेश्वर मध्ये शिक्षक पालक यांच्या नियोजनातून अतिशय छान बालसंस्कार वर्ग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु असून कोरोना सारख्या परिस्थिती मध्ये मुलांची २ वर्षे वाया गेली . या शिबीराच्या माध्यमातून मुलांची गुणवत्ता वाढ व सर्वांगिण विकास होणेस मदत होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली .


सर्व पालकांनी आपल्या मुलांना वेळेत पाठवून सहकार्य करावे . असे आवाहन शाळेच्या वतीने केले असून बरोबर ७ वाजता बालगोपाळ शाळेत हजर असतात . पालक वर्गाचे मोठ्या प्रमाणात सहकार्य होत आहे .
शिबीर सुरु होऊन १८ दिवस झाले असून दीड महीन्यात निश्चीत मुलांच्या प्रगतीत वाढ झालेली दिसून येईल त्यामुळे या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यास घ्यावा .
सदर शिबीर यशस्वी संपन्न होणेसाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव सस्ते यांच्या संकल्पनेतून शाळेच्या उपक्रम शिल उपशिक्षिका सुनिता शिंदे,निर्मला खताळ, सौ . मनिषा चव्हाण यांनी मनापासून प्रयत्न केले असून सर्व पालक वर्गाची साथ मिळत आहे त्यामुळे शाळांना सुट्टया लागतील परंतू कांबळेश्वर शाळेने सलग दीड महिन्याचे विविध उपक्रमाचे बालसंस्कार वर्ग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग म्हणजे विद्यार्थ्यांना एक व्यक्तिमत्त्व विकासासाठी सुवर्ण संधीच निर्माण झाली आहे .
सदर उपक्रमास बारामती तालुका पंचायत समिती बारामती गट शिक्षणाधिकारी संपतराव गावडे, विस्तार अधिकारी संजय जाधव यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *