महाराष्ट्रातल्या सात कर्तबगार महिलांचा केला सन्मान
भिवंडी(गावकरी TODAY NEWS ):- ठाणे जिल्ह्यातील कोनगाव येथील सेरेमनी बॅक्वेट हॉल या ठिकाणी आरपीआय आठवले पक्षाच्या वरिष्ठांच्या निर्देशावरून संगीता राजेश गायकवाड अध्यक्षा ठाणे जिल्हा ग्रामीण आरपीआय (आ) महिला आघाडी यांनी आयोजित केला होता. सदर मेळाव्याला उदंड व प्रचंड प्रतिसाद मिळून हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित झाल्या होत्या.

सदर प्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय ऑर्गनायझर तथा राष्ट्रीय निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. बी के बर्वे साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष शीलाताई गांगुर्डे राष्ट्रीय सचिव दयाळ बहादुरे राष्ट्रीय संघटक तथा ठाणे जिल्ह्याचे निरीक्षक सुरेश दादा बारशिंगे व पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी अण्णासाहेब रोकडे. बाळकृष्ण गायकवाड. बाळाराम गायकवाड. श्याम शेवाळे. अनिल धनगर. बाळ भालेराव. विनोद थोरात. दशरथ गायकवाड .उल्हासनगर मनपा भगवान भालेराव .बिके गायकवाड .जयवंत सोनवणे. सिद्धार्थ गायकवाड. प्रवीण गायकवाड. जयवंत थोरात. कुणाल दोंदे .भरत जाधव. रोशन जाधव .नारायण जाधव .आरती भोईर .मनीषा जाधव. रमेश बर्वे (डोंबिवली)संदीप (बाबा)जाधव. मीनाताई साळवे. अपेक्षा दळवी. तसेच संगीता गायकवाड यांची ठाणे जिल्हा महिला पदाधिकारी कमिटी उपस्थित होती .

“महिला मेळाव्याचे प्रमुख वक्ते प्राचार्य रमेश जाधव सर तसेच प्रामुख्याने उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा शितलताई तोंडलीकर. आरपीआय एकतावादी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विकास निकम .आगरी कोळी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते देवानंद भोईर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेते तथा कल्याण डोंबिवली महापालिका मा. सभापती सुरेश जोशी. अभिनव सहकारी बँकेचे संचालक सुशील मनोहर. काँग्रेस पक्षाच्या प्रणेते उर्मिला भोईर रमाबाई ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा सत्कारमूर्ती ज्योती गायकवाड. काँग्रेस पर्यावरण विभाग ठाणे जिल्हा अध्यक्षा रीनाताई खांडेकर. समाजसेविका वैशाली कांबळे. माजी जिल्हा परिषद सदस्य कविताताई भगत .भिवंडी तालुका पंचायत समितीच्या मा. सभापती माधुरी शशिकांत म्हात्रे.

कोनगाव माजी सरपंच अपूर्वा महेंद्र म्हात्रे तसेच माजी सरपंच कोनगाव संध्या भरत जाधव कोनगाव विद्यमान सरपंच रेखाताई सदाशिव पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच तालुक्यातील गोरसई गावचे विद्यमान सरपंच संगीता गायकवाड यांचे दिर सुदेश (अण्णा)गायकवाड व संपूर्ण गोरसई गावची सदस्य कमिटी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गायकवाड धनराज गायकवाड महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड पत्रकार संतोष चव्हाण एबीपी माझाच्या वृत्त निवेदिका शामल भंडारे कल्याण डोंबिवली माजी नगरसेविका संगीता सिद्धार्थ गायकवाड पत्रकार सिद्धार्थ अर्जुन गायकवाड नंदिनीताई साळवे तसेच पत्रकार कुसुमताई चंद्रमोरे मुन्सिपल युनियनअध्यक्ष भारत तांबे तसेच गायक व संगीत संयोजक दिनेश भोईर व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व संगीता गायकवाड यांच्या समर्थक महिला हजारोंच्या संख्येने मेळाव्यास उपस्थित होत्या. एवढा मोठा भव्य हॉल कमी पडल्यामुळे शेकडो महिलांना परत जावे लागले. किमान दीड हजार महिलांना संगीता गायकवाड यांना न भेटताच परत जावे लागले ही बाब संगीता गायकवाड यांच्या मनाला लागली.
नियोजित कार्यक्रमात सदर प्रसंगी राज्यातून सात कर्तबगार महिलांना संगीता गायकवाड संयोजन समितीने प्रेरणा पुरस्काराने सन्मानित केले .
“संगीता गायकवाड यांची लोकप्रियता व त्यांनी केलेल्या कामाची पावती जमलेल्या प्रचंड गर्दी व उपस्थित जनसमुदायामुळे पूर्णपणे दिसून येत होती.
राज्यातील उपस्थित सत्कारमूर्तींमध्ये१) सौ भावनाताई गांगुर्डे पोलिस सीआयएसएफ२) कर्तबगार संपादिका रेणुकाताई संतोष चव्हाण ३) कर्तबगार समाजसेविका अक्षरा अजय लाड ४) रा.कल्याण भिवंडीचे आदर्श कन्या डॉ. वैभवी वर्षा विजय जाधव ५) कोन गावची कन्या डॉ. मानसी सारिका नरेश सोनवणे ६) माता रमाई ब्रिगेडच्या अध्यक्षा ज्येष्ठ समाजसेविका ज्योतीताई गायकवाड ७) ठाणे जिल्ह्याची लेक भिवंडीचे आदर्श कन्या श्रावणी राजेश काबाडी.
उपरोक्त सत्कार मूर्तींचा संगीता गायकवाड संयोजन समितीतर्फे प्रेरणा पुरस्काराने गौरव करून त्यांचा नेत्र दीपक असा सत्कार संपन्न झाला तसा 400 महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला महिला मेळावा उपस्थित असणाऱ्या सर्वांचा जल्लोषात सन्मान करण्यात आला प्राचार्य रमेश जाधव सर यांनी महिला मेळाव्याला उद्देशून आयोजकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या मेळावा घेणे ही साधी बाब नाही एखाद्याला काम करायला लावून त्याची मजा घेणारे खूप सारे आहेत पण जो संघर्ष कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांना तारेवरची कसरत करावी लागते त्याचा विचार करणे आवश्यक आहे कारण कोणाचीही मदत न घेता संगीता गायकवाड यांनी एकटीने हा कार्यक्रम सक्सेस केलाय.मात्र आयोजकांनी कुठेही न डगमगता असल्या टीकात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून यशस्वी वाटचाल सुरू ठेवावी. कार्यक्रम कसा फेल ठरेल याकडे बघणारे खूप सारे आहेत पण त्यातूनही झाले गेले विसरून पुढे मार्गस्थ व्हावे प्राचार्य रमेश जाधव पुढे म्हणाले की संगीता गायकवाड यांची कार्यकारणी आयोजन समिती अत्यंत प्रभावी व संघटन कौशल्य बांधण्यात तरबेजआहे इथे मोठ्या संख्येने सर्व पक्षाचे व सर्व जाती धर्माचे पदाधिकारी उपस्थित असल्याने त्यांनी ते दाखवून दिले आहे की संगीता गायकवाड भी कुछ कम नही मोठ्या कार्यक्रम घेणे ही साधी गोष्ट नसून त्याकरिता आयोजकांना तारेवरची कसरत करावी लागते मात्र त्यांनी एकटीने ते करून दाखवलं हे अभिमानास्पद आहे .मात्र सर्व समाजामध्ये व पक्षांमध्ये संगीता गायकवाड यांचे इतके संबंध आहेत की वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी संघटनांनी त्यांच्या महिला मेळाव्याला उपस्थिती लावून चार चाँद लावले हे फक्त व्हाट्सअप चे मेसेज वरच निमंत्रण होते हे आश्चर्य आहे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री ना. कपिल जी पाटील हे या मेळाव्याला उपस्थित राहणार होते मात्र अत्यंत तातडीने हैदराबाद येथे जावे लागत असल्यामुळे तसं त्यांनी संगीता गायकवाड यांना प्रत्यक्ष सांगितले व मेळाव्याला शुभेच्छा दिल्या तसेच सीमाताई रामदास आठवले राष्ट्रीय नेते आरपीआय महिला आघाडी यांना मुंबईची तात्काळ सभा लागल्यामुळे त्यांनी तसे सौ संगीता गायकवाड यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविले व मेळाव्याला शुभेच्छा दिल्या मेळावा कसा असावा हा आदर्श या मेळाव्याकडे पाहून नक्कीच वाटेल काहींना मेळाव्याला जयंती असे म्हटले आहे मात्र तसे नसून सदर मेळावा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधून कर्तबगार महिलांचा सन्मान व भव्य मेळावा आहे. हे स्पष्ट लिहिले असताना सुद्धा काही जण समजून घेत नाही आश्चर्य आहे.तरी पुन्हा एकदा वाचून त्यांनी समजून घ्यावं असे प्रतिपादन रमेश जाधव यांनी केले आपल्याच घरात आपण बोलणे योग्य नाही तर आलेल्या पाहुण्यांना सुद्धा बोलण्याची संधी द्यावी व प्रोटोकॉल पाळावा ही सुज्ञाने लक्षात घ्यावे हा आयोजकांचा दोष नसून प्रथम मान्यवरांनी लक्षात घ्यावं विचार मंचावरील सुद्धा काही नियम असतात सूत्रसंचालकाला याचा वेळोवेळी सूचना करण्याचा अधिकार आयोजकांचा असतो मात्र विचार मंचावरील मंडळी त्यांना सूचना करते याचा सत्कार करा त्याचा सत्कार करा’ असे सांगून त्रास देण्याची भूमिका ही योग्य नाही. अशामुळे कार्यक्रमाचा मुख्य गाभा मुख्य सार हा नष्ट होतो विचार मंचावरील मंडळींना नाही समोर बसलेल्या शेकडो जनसमुदायाला ते जाणवतं व तशा प्रतिक्रिया नंतर उमटतात आपल्याच घरात आपणच बोलणे हे योग्य नाही तर आपल्याकडे इतरही पाहुणे आले तेही प्रचंड उंचीचे आहेत त्यांनाही बोलण्याची संधी मिळावी हे काही जणांच्या लक्षात आलं नाही.

खूप सारी मंडळी मागे बसून पाहत होती मात्र ज्येष्ठ मान्यवर सुज्ञ मंडळींनी व्यासपीठावर येण्यासाठी प्रयत्न मुळीच केला नाही किंवा संगीता राजेश गायकवाड अध्यक्षा महिला आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या कार्याचा राबता एवढा मोठा आहे हे सर्व सूत्रसंचालकाला निवेदकाला सभेसमोर मांडायचे होते त्यांची मुलं त्यांचे यजमान हे कुटुंब नेमकं काय आहे. हे सांगून देण्याचा प्रयत्न सूत्रसंचालकांचा होता. मात्र संभाव्य गोंधळाच्या परिस्थितीमुळे त्यांना व्यक्त होता आले नाही. ही त्यांनी आयोजकांकडे नाराजी व्यक्त केली तसेच सात सत्कारमूर्तींचे कार्य नेमकं काय आहे तेही वाचून दाखवण्याला काही जणांनी मज्जाव केला फक्त नावे घेऊन सत्कार करा असे म्हटले त्यामुळे त्यांचाही कार्य दाबण्याचा प्रकार तिथे प्रकर्षाने जाणवला. कोणत्याही विचार मंचावर ज्यांचा सत्कार घडणारच आहे त्या सत्काराचा ध्येय आणि उद्देश काय आहे हे जर वाचण्याला विचार मंडळी विरोध करत असेल तर याच्या सारखे दुसरे दुःख नाही. हा आयोजकांचा दोष नसून पाहुणे मंडळीने लक्षात घ्यावे.
पॅंथरचे फाउंडर तसेच दलित पॅंथरचे तत्कालीन लढवय्ये प्राचार्य रमेश जाधव सर तसेच सदर प्रसंगी केंद्रीय आरपीआय उपाध्यक्ष शीलाताई गांगुर्डे केंद्रीय ऑर्गनायझर तथा केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी बी. के.बर्वे साहेब राष्ट्रीय संघटक तथा निरीक्षक सुरेश दादा बार्शींगे रिपाई एकतावादी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकासजी निकम आगरी कोळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवानंद दादा भोईर प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे रिपाई च्या माजी जिल्हाध्यक्ष अपेक्षा अरुण दळवी आदींनी भव्य मेळाव्याला मोलाचे मार्गदर्शन करून संबोधित केले खूप साऱ्या मंडळींना बोलण्या बोलायचे होते मात्र वेळेअभावी शक्य झालं नाही अत्यंत परिणामकारक व सुयोग्य सूत्रसंचालन शशिकांत चव्हाण यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार संगीता राजेश गायकवाड यांनी मानले हा मेळावा एवढा यशस्वी झाला आहे की सबंध जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. असे प्रतिपादन अभिनव बँकेचे डायरेक्टर सुशील मनोहर यांनी व्यक्त केले.
हॉल हाऊसफुल झाल्यामुळे संगीता गायकवाड यांचे समर्थक व कार्यकर्त्या महिलांना प्रचंड गर्दीमुळे त्यांना त्यांची भेट घेणे शक्य नसल्यामुळे परस्पर नाराज होऊन बऱ्याचशा महिलांना परत जावे लागले त्याबद्दल संगीता गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली.