इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथे वनरक्षक व प्राणी मित्रांकडून जीवदान

महाराष्ट्र


गावंकरी Today News Network ब्युरो चीफ रिपोर्टर रियाज पठाण.
*बारामती* आज दिनांक २१.एप्रिल रोजी इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील, प्रवीण घोळवे यांच्या विहिरी मध्ये पडलेल्या मादी जातीचा कोल्हा ५. तासानंतर बाहेर काढून,निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात यश आले.
यामध्ये वन विभाग मध्ये कार्यरत असणारे अजय घावटे वन परिमंडळ अधिकारी ; तसेच उल्हास मोरे, वनरक्षक, लक्ष्मण कुंभार वन मजूर,आणि इंदापूर व बारामती मध्ये वन विभाग मध्ये कार्यरत असणारे सदैव वन्य प्राणी रेस्क्यू आणि प्राण्यांना पाण्याची सोय करणारे रजनीकांत गटकळ तसेच इको रेक्यू टीम चे डॉ.श्रीकांत देशमुख व अनिकेत तुपे आणि बारामती रेक्यू टीम चे श्रेयश कांबळे आणि ऋषी मोरे आणि परिसरातील शेतकरी यांनी मोलाची कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *