गावंकरी Today News Network.ब्यूरो रिपोर्टर रियाज पठाण.
बारामती दिनांक १९/०४/२०२३ रोजी बारामती तालुक्यातील मळद येथे केंद्रस्तरीय शाळा पूर्व तयारी मेळाव्याची कार्यशाळा संपन्न झाली.
आगामी वर्ष २०२३ -२४ मध्ये इयत्ता पहिलीसाठी दाखल पात्र बालकांसाठी शाळा पूर्वतयारी ‘बालकाचे शाळेतील पहिले पाऊल ‘ या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या शिक्षकांना , अंगणवाडी ताईंना ,स्वयंसेवक व पालक यांच्यासोबत शाळा पूर्व तयारी १२ आठवडे करून घ्यायची आहे.त्याचाच एक भाग म्हणून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याचे अध्यक्ष बारामती तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्मा. संपतराव गावडे ; काटेवाडी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी नवनाथ कुचेकर ,मळद केंद्राचे केंद्रप्रमुख बाळकृष्ण खरात विषय तज्ञ मनीषा जराड ,गणेश पाडुळे मुख्याध्यापक काकासाहेब रोटे,विश्वासराव शिंदे तसेच केंद्रातील सर्व शाळांचे मुख्य शिक्षक उपशिक्षक व अंगणवाडी ताई उपस्थित होत्या.
संपूर्ण प्रशिक्षणात श्री दत्तात्रय जाधव व श्री तात्यासाहेब निकम यांनी सखोल मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुण्यांना बालकांना , पालकांना ढोल , ताशा ,लेझीम प्रात्यक्षिक सादर करून शाळेच्या आवारात आणण्यात आले.

शाळापूर्व तयारीचे सात स्टॉल शिक्षकांनी लावले होते. त्यामध्ये वजन उंची मोजणे. शारीरिक विकास ,बौद्धिक विकास ,सामाजिक आणि भावनात्मक विकास , भाषा विकास , गणन पूर्व तयारी, शेवटी प्रमाणपत्र वितरणाचा स्टॉल लावण्यात आला होता. त्यामध्ये सर्व शिक्षक अतिशय उत्साहात सहभागी झाले होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय संपतराव गावडे साहेबांनी विद्यार्थी हा पूर्व प्राथमिक मधून जेव्हा प्राथमिक शाळेत दाखल होणार आहे.तेव्हा त्याने निर्भीड, आनंददायी वातावरणात , नियमितपणे शालेय परिसरात यावे त्याने उत्तम शिक्षण घ्यावे. यासाठी शाळेत पोषक वातावरण तयार केले जाईल. यासाठी पालकांना आयडिया कार्डचा उपयोग करता येईल. बालकांसाठी कृती कार्डचा वापर करता येईल. या विषयीचा उहापोह त्यांनी केला.
मे -जून महिन्यात शिक्षक पालकांना दहा ते बारा वेळा भेटणार आहेत.त्यांनी पालकांचा गट तयार करायचा आहे. त्याच्या माध्यमातून त्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन करायचे आहे.दिनांक २४ एप्रिल ते २९ एप्रिल २०२३च्या दरम्यान शाळा स्तरावर शाळा पूर्व तयारी मेळावा घेऊन ‘प्रवेशोत्सव ‘ साजरा करायचा आहे .दुसरा मेळावा जून महिन्यात घ्यावयाचा आहे. गावातील मान्यवरांना शाळेत बोलावून त्यांच्या हस्ते बालकांना प्रमाणपत्र वितरित करायचे आहे.
शाळा पूर्व तयारी ही कार्यशाळा न राहता त्याला मेळाव्याचे ,जत्रेचे स्वरूप यावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात सन्मा. नवनाथ कुचेकर साहेब ,सन्मा. बाळकृष्ण खरात साहेब , मनीषा जराड यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गावंकरी Today News चे ब्यूरो रिपोर्टर रियाज पठाण यांचा सन्मान गटशिक्षणाधिकारी माननीय संपतराव गावडे साहेब यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री तात्यासाहेब निकम यांनी केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्तात्रय जाधव मुख्या.गुनवडी यांनी केले .