दि. १४ एप्रिल २०२३( गावकरी TODAY NEWS) शुक्रवार दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व, महामानव, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी होत आहे.
समता, बंधुता, एकता अशी अनेक मुल्य जगभरात रुजविण्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंतीनिमित्त भिवंडी पंचायत समिती कार्यालय येथिल सभागृहात अभिवादन करण्यात आले. पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. प्रदिप घोरपडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. बाबासाहेबाचे बालपण, शिक्षण, कार्य व सामाजिक भान या सगळ्या विषयावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी उप गटविकास अधिकारी (ग्रामपंचायत विस्तार अधिकारी ) श्री. इंद्रजीत काळे.दिपक देवरे. रूपेश पाटिल. बाळकुष्णा काचरे.पाटील मँडम. यांनी बाबासाहेब यांच्या बद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की बाबासाहेबाचे विचार आत्मसात करने गरजेचे आहे. बाबासाहेब एका विशिष्ट जाती वर्गाचे अस न मानता त्यांनी जे कार्य केलंय ते जगासमोर आदर्श आहे हे पाहणे देखिल महत्त्वाचं आहे.

सर्वाना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खुप शुभेच्छा. बाबासाहेब बद्दल बोललो तर रात्रदिवस जातील एवढ समृध्द कार्य त्यांनी केलं आहे. अस एक ही क्षेत्र नाही ज्यावर बाबासाहेबांनी कार्य केलं नाही. त्याचे विचार कृतीत उतरवणं म्हणजे बाबासाहेबांना केलेलं अभिवादन असेल असे प्रतिपादन.डॉ. प्रदिप घोरपडे यांनी केले.