शिक्षणाचे प्रणेते, समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना महानगरपालिकेतर्फे अभिवादन

भिवंडी



ज्योतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०), हे महात्मा फुले नावाने लोकप्रिय होते, असे हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. अशा थोर समाजसुधारकांची जयंती साजरी करणेचे शासन निर्देश आणि मनपा प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या आदेशान्वये उप-आयुक्त (मुख्यालय) दिपक पुजारी व उप-आयुक्त (कर) दिपक झिंजाड यांनी संयुक्तरित्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, त्यांच्या स्मृतीस महानगरपालिकेच्यावतीने अभिवादन करण्यांत आले. यावेळी मुलेप तथा लेखा परिक्षक किरण तायडे, उप- आयुक्त प्रणाली घोंगे ऊपस्थित होते.

महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली • शाळा सुरू केली. खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह

सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय “महात्मा” अशी पदवी प्रदान केली होती.

महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू- आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.
महानगरपालिकेतील तळ मजल्यावरील या जयंती कार्यक्रमाच्यावेळी सहाय्यक आयुक्त (प्रशासन) बाळाराम
जाधव, प्रभाग अधिकारी सुदाम जाधव, नितीन पाटील, उद्यान अधिक्षक निलेश संख्ये, आरोग्य विभाग प्रमुख सोनावणे, विविध विभाग प्रमुख इ. अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विशेषतः महिला कर्मचा-यांची ऊपस्थिती लक्षणीय होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *