अंबाडी दिं. ७. : अंबाडी शिरसाड या मार्गांवरील कोपरोली जवळ. जंगदब ढाब्याच्या समोर . कार व मोटर सायकल च्या धडकेत पिता सह. तिन. वर्षाच्या चिमुकल्या बाळाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंम्भीर झाल्याची घटना आज दुपारी घडली
अल्पेश बाळकृष्ण पाटील. (. वय 40.) व इशांत अल्पेश पाटील( वय 3 वर्ष) या बाप लेकाचा या अपघातात मृत्यू झाला अल्पेश पाटील राहणार अंबाडी हे आपल्या पत्नी अमृता पाटील (वय 35) व मुलगा पोंरस पाटील( वय 10). यांच्या समवेत मोटर सायकल वरून गणेशपूरी येथे साखरपुडा कार्यक्रमास चालले होते, कोपरोली येथे त्याची मोटरसायकल आली असता वज्रेश्वरी दिशेकडून भरधावं वेगाने येणाऱ्या कार चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या या मोटरसायकल ला येऊन धडकला या मध्ये दोघा बापलेकाचा डोक्यास मार लागून मृत्यू झाला असून अल्पेश ची पत्नी व दुसरा मुलगा हे गंभीर जखमी असून त्यांना अंबाडी येथील साईदत्त रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
सदर.अपघातातील कार चालक.सुरज रघुनाथ शिदे हा फरार आहे याबाबत गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी अपघात स्थळी तातडीने पोहचून जखमी ना पुढील उपचारा साठी पाठविले तर कार चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
