टेंभवली गावात हनुमान जन्मोत्सवा निमित्त हरिपाठ आणि कीर्तनाचे आयोजन

भिवंडी

टेंभवली गावात हनुमान जन्मोत्सवा निमित्त हरिपाठ आणि कीर्तनाचे आयोजन
_________________________
भिवंडी दि.७( गावकरी TODAY NEWS ) सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात ग्रामीण स्तरावर देवी-देवतांच्या जन्मोत्सवानिमित्ताने यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहेत.दरम्यान ६ एप्रिल रोजी भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील टेंभवली गावात हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने महिलांनी महिला मंडळांच्या माध्यमातून वर्गणी जमा करून हरिपाठ आणि किर्तनाचे आयोजन केले होते.महिलांनी शुक्रवारी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ज्ञानेश्वरीतील अभंगाची गोडी गायली.त्यानंतर रात्री ९ ते ११ या वेळेत खांडवाल येथील कीर्तनकार ह.भ.प जगन्नाथ पाटील यांनी आपल्या सुश्राव्य किर्तनातून भाविकांना हिंदू धर्म टिकवून ठेवण्यासाठी अध्यात्माचे धडे गिरवले.

सदर प्रसंगी भक्तगण भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध झाले होते.यावेळी लता बाबरे,निरा पाटील,शेवंती नांदूरकर, निर्मला बाबरे,शकुंतला नांदूरकर, गुलाब मढवी, अल्का भोईर, कविता भोईर,मेघा पाटील,निलम नांदूरकर, भावना नांदूरकर,उषा नांदूरकर, कल्पना घरत,प्रभा गोराडकर,कृषणीबाई गोरसईकर,पार्वती गोरसईकर,निता पाटील,शोभा भोईर,मुक्ता पाटील,आशा बाबरे,हौसा पाटील,कुंता गोराडकर आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *