राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भिवंडी भाजपाच्या वतीने शहरातील धामणकर नाका उड्डाणपुलाखाली शनिवारी राहुल गांधींच्या प्रतिमेला चप्पल मारून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी बोलताना सांगितले की,अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार असताना पोलीस यंत्रणेचे बेकायदेशीर वापर करून केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार डॉ.किरीट सोमय्या, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा, अर्णव गोस्वामी , कंगना राणावत, केतकी चितळे यांच्यावर कारवाई केली व संविधानचे अपमान करण्यात आले.मात्र न्यायालयाने दिलेली शिक्षा ना मानत राहुल गांधी व काँग्रेस व अनेक पक्षाचेनेते न्यायालयाचा व भारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधानाचा अपमान करत असल्याने भाजपा राज्यभर आंदोलन करत आहे.यावेळी ठाणे ग्रामीण महासचिव जितेंद्र डाकी, संघटन महासचिव ऍड.हर्षल पाटील, उपाध्यक्ष सुमित पाटील, यशवंत टावरे, निष्काम भैरी, माजी नगरसेवक निलेश चौधरी, महासचिव राजू गजेंगी, विशाल पाठारे, प्रदेश सदस्य प्रेषित जयवंत, नरेश करिजेनगुल यांनी आपले व्यक्तव्य मांडून राहुल गांधींचे निषेध केले.यावेळी शेकडो पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
