बारामती : (प्रतिनिधी:रियाज पठाण.)अध्यात्मिक संत सेवा भावी ट्रस्टच्या माध्यमातून,संत बाळुमामा भंडारा उत्सवा निमीत्ताने दि.१८मार्च २०२३रोजी,भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इंदापूर व बारामती तालुक्यातील असंख्य महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते.

ट्रस्ट चे अध्यक्ष.जमीर शेख यांनी नेत्र चिकित्सक डाॅ.मन्जुर शेख,व जंक्शन ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.
यावेळी अशोक गावडे, देवेंद्र(नाना)हरिहर,दाउद शेख,बापू खारतोडे,विश्वजित घोळवे,युवराज काळे,जनार्दन लोंढे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

