भिवंडी दि.४ मूलुंड येथील प्रियदर्शनी हॉलमध्ये सेवनदन ब्लॅक बेल्ट हसन इस्माईल यांनी ११ ते १२ फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन केले होते.यामध्ये तब्बल १२ देशांनी सहभाग नोंदवला होता.तर सुमारे ३० हजाराहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला.दरम्यान या स्पर्धेत भिवंडीतील भादवड-टेमघरपाडा येथील नाईक कराटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकूण १४ मेडल्स पटकावले आहेत.यामध्ये ९ सुवर्ण,४ चांदीचे तर १ रौप्य पदक जिंकून भिवंडी तालुक्याचेच नव्हे तर ठाणे जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे शिक्षक चिप इंस्टेटर प्रथमदन ब्लॅक बेल्ट,तायकोंडा कराटे तथा राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते आनंद कृष्णा नाईक सर आणि वर्गशिक्षक ब्लॅक बेल्ट विशेषतज्ञ गणेश कव्वर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS
