भिवंडी महानगरपालिकेत नागरिकांची कागदपत्रे बेवारस

भिवंडी



भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासह मनपाच्या पाचही प्रभागात सद्या सावळागोंधळ सुरु असून वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने भोंगळ कारभार सुरु आहे. प्रभाग कार्यालयात कागदपत्रे व नसत्या गायब झाल्याने विविध प्रकारच्या कारवाया थंडावल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
भिवंडी महानगरपालिकेचे सहा मजली कार्यालयात अधिकारी आणि विविध विभागीय कार्यालये स्थापन केले असून पालिकेची महत्वाची कागदपत्रे प्रत्येक विभागीय कार्यालयात आणि इतर ठिकाणी ठेवले जातात. मात्र गेल्या आठ दिवसांपासून मुख्य कार्यालयातील पहिल्या मजल्यावर लिफ्टच्या शेजारी नागरिकांची कागदपत्रे बेवारस स्थितीत पडले असून त्या मजल्यावर असलेल्या आस्थापना विभागाने देखील या कागदपत्रांकडे दुर्लक्ष्य केले आहे. अशाप्रकारे नागरिकांच्या आणि पालिकेच्या महत्वाच्या कागदपत्रांची हेळसांड सुरु असून याकडे कार्यालयीन विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष्य करीत आहेत.
भिवंडी महानगरपालिकेच्या पाच प्रभाग समिती असून प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात कागदपत्रांची हेळसांड सुरु असून अनेकवेळा मुख्य कार्यालयातून आलेली कागदपत्रे प्रभाग कार्यालयात मिळत नाहीत तर नागरिकांच्या व करदात्यांच्या महत्वाच्या कागदपत्रांच्या नस्त्या गायब झालेल्या आढळून येत आहेत. . त्यामुळे बेशिस्त सुरु असलेल्या कारभारास मनपा आयुक्त विजयकुमार म्हसळा यांनी शिस्त लावावी,अशी मागणी शहरातील करदात्या नागरिकांकडून केली जात आहे.
महानगरपालिकेची कागदपत्रे यांची हेळसांड न करता महत्वाच्या कागदपत्रांच्या नसती व फायली यांची व्यवस्थित जपणूक करण्यासाठी संबंधित अधिकारी व विभाग प्रमुखांची बैठक लावून त्यांना आदेश देण्याची कारवाई करण्यात येईल.
अशी माहिती दीपक पुजारी, उपायुक्त मुख्यालय यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *