स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान अंतर्गत प्रत्येक महिन्यांत आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबिवण्यात येत आहे या अनुषंगाने दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री. मनुज जिंदल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र. वि) श्री. अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा. पु. व स्व) श्री. दादाभाऊ गुंजाळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं) श्री. प्रमोद काळे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग श्री. अर्जुन गोळे यांच्या शुभहस्ते सर्व सेवा निवृत्त धारकांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की, सर्व सेवा निवृत्त धारकांना सर्व सेवानिवृत्तीचे लाभ सेवा निवृत्तीच्या दिवशी देण्यात यावेत. सदर वेळी आरोग्य सहाय्यक अंबरनाथ श्रीम. सुरेखा तानाजी मोरे, आरोग्य सहाय्यक मुरबाड श्रीम. हर्षदा हरिश्चंद्र घोलप, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अंबरनाथ श्रीम. अनिता अजय कुलकर्णी, वरीष्ठ सहाय्यक (साप्रवि) श्रीम. श्रुती कदम, वरीष्ठ सहाय्यक (शिक्षण प्राथमिक) श्रीम. गिता शिंदे, प्राथमिक शिक्षक अंबरनाथ श्री. मिलिंद बाबुराव शिलवंत, प्राथमिक शिक्षक भिवंडी श्री. नितीन चिंतामण कांबळे, प्राथमिक शिक्षक भिवंडी श्रीम. अमिता रमेश जोशी, प्राथमिक शिक्षक शहापूर श्री. जयवंत नामदेव सांबरे, मुख्याध्यापक कल्याण श्री. विजय यादव परदेशी, मुख्याध्यापिका शहापूर श्रीम. जया पदमाकर केवारी, केंद्रप्रमुख शहापूर श्री. नामदेव रामा शिंदे यांना त्यांनी दिलेल्या जिल्हा परिषदेचे सेवेबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या भावी आयुष्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.
