भिवंडी; तालुक्यातील अंबाडी नाका येथील आदित्य फाऊंडेशन संचालित विद्याप्रबोधिनी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत छत्रपती शिवाजीमहाराज महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली.
अंबाडी नाका हा तालुक्यातील जनसंपर्काच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून सुप्रसिद्ध आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवसायिक,नोकरदार,व बहुसंख्य शिक्षित वर्गातील लोकांच्या वास्तव्याचे ठिकाण अशीही ओळख आहे.
अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी मराठी भाषेबरोबर भविष्याच्या दृष्टीकोनातून इंग्रजी शिक्षणही मुलांना मिळावे आणि तेसुद्धा सर्वसामान्य समाजातील ही सामाजिक जाणीव ठेवून केलेल्या विचाराची व्यक्ति म्हणजे डॉ.प्रदीप नाशिक पाटील साहेब.यांनी आदित्य फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केलीआहे.

व विद्याप्रबोधिनी या नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा समाजाची गरज ओळखून सुरू केली आहे.आजच्या मितीस या शाळेत ज्यू.के.जी.ते इयत्ता आठवी पर्यंत160 विद्यार्थ्यी शिकत आहेत,तसेच 16 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग कार्यरत आहेत.
याच शाळेत 19 फेब्रुवारी2023 रोजी छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात साजरा करीत असताना च यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.या कार्यक्रमात पालकवर्ग,विद्यार्थ्यी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारीवर्ग,पाहुणे व हितचिंतक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात अंबाडीनाका ते झिडके गावात मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत छत्रपती शिवाजीमहाराज वेशभूषेतील विद्यार्थ्यी,महाराजांचे विश्वासू सरदार तानाजी मालुसरे,बाजीप्रभू,शेलारमामा,संताजी ,धनाजी,राजमाता माँसाहेब जिजाऊ आदिंचे पोषाख परिधान करून विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते.त्यांची मिरवणुकीत ठिक-ठिकाणी आदरभावाने ओवाळीने होत होती.

.अशा मिरवणुकीत छत्रपतींचा घोषणांनी जयजयकार केला जात होता.
मिरवणुकीनंतर छत्रपतींच्या जीवनावर भाषणे,गाणी,पोवाडे,नृत्य हे कार्यक्रम सादर करण्यात आले.या कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ.आदिती पाटील मॅडम,उपमुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील मॅडम यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रतिक्षा साबळे मॅडम यांनी केले.कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना भोजन देण्यात आले.
या सुनियोजनबद्ध कार्यक्रमाचे प्रेरणास्थान संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष डॉ.प्रदीप पाटील साहेब व संस्थापक/सचिव डॉ.प्रतिमा पाटील मॅडम हे आहेत.अशा प्रकारे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त या भागात प्रथमच असा भव्यदिव्य स्वरूपात आयोजित केलेल्या शिक्षण संस्थेच्या उपक्रमाचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
बिरो रिपोट विजय गायकवाड़