पडघ्यात तालुकास्तरीय कुपोषणाच्या आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

भिवंडी


आरोग्य विभाग, पंचायत समिती-भिवंडी व जगन्नाथ म्हाप्रळकर विकास फाउन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय सॅम मॅम बालकांचे तंज्ञामार्फत आरोग्य तपासणी शिबिर भिवंडी तालुक्यातील पडघा आरोग्य केंद्रात घेण्यात आले.


यावेळी आमदार शांताराम मोरे, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, जगन्नाथ म्हाप्रळकर विकास फाउन्डेशनचे अध्यक्ष सुहास म्हाप्रळकर,
एकात्मिक प्रकल्प अधिकारी वैशाली दाभाडे, बालरोग तज्ञ डॉ. यशवंत सदावर्ते, तालुका आरोग्य अधिकारी माधव वाघमारे, श्रमजीवी संघटनेचे महेंद्र निरगुडा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती गावडे, तालुका समूह संघटक मयुरी काबाडी उपस्थित होते.




संतुलित आहार बालकांच्या जनजागृतीसाठी
स्टॉल लावण्यात आले होते. बालकांना कोणते पोषण आहार द्यावे याची उपयुक्त माहिती देण्यात आली.


मुलांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून कुपोषणाच्या निर्मूलनासाठी वाटचाल अम्ही केलेले आहे. असे यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधव वाघमारे यांनी बोलताना सांगितले.यावेळी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकेच्या मदतीने मुलांना आरोग्य शिबिरास पोहोचवण्यास मदत करण्यात आली.तर आठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ,तालुका विभागातील विविध संवर्गातील अधिकारी कर्मचारी तर गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य पर्यवेक्षक शशिकांत चव्हाण यांनी केले.बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS
मिलिंद जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *