* .*
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य असं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या रक्तदान शिबिरांमध्ये १८ पगडी जातीतल्या लोकांनी एकत्र येऊन आपलं रक्तदान स्वराज्यसाठी दिले. एकात्मतेची एकत्रित राहण्याचा संदेश देत. जातपात धर्म सोडून आपण एक आहोत, मानव म्हणून आपण एक आहोत. एकात्मतेची भावना निर्माण केली असे शूरवीर वीरांना आठवण काढीत यावेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या शिबिराचे आयोजन १९ फेब्रुवारी २०२३ रोजी मावळी मंडळ, चरई, ठाणे प. येथे करण्यात आले होते. ह्या शिबिराचे उद्घाटना प्रसंगी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघोले तसेच संस्थेचे संस्थापक सदस्य सुनील गंद्रे, संस्थेचे अध्यक्ष रुपेश शिंदे सदस्य अजय भोसले पोलीस मुख्यालय शाळेचे मुख्याध्यापक अमोल पाटील, आरती गाढवे बाळा म्हसकर, तसेच ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष इंदुलकर हे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पुष्पहार अर्पण करून नारळ वाढवून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ह्या शिबिरांमध्ये लोकमान्य टिळक अर्थात टिसा ब्लड बँक तर्फे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते.
समाजाचे कर्तव्य म्हणून २०० हुनअधिक लोकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला काही महिलांचा व पुरुषांचा हिमोग्लोबिन व वजन कमी असल्यामुळे रक्तदान करता आले नाही. पण त्यांची जिद्द त्यांची जी चिकाटी ही अचूकपणे दिसून आले. जवळजवळ २०० हुन अधिक लोकांनी रक्तदानात सहभाग घेतला, त्यातील १०२ रक्तदात्यांनी भव्य दिव्य अशा रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन हे रक्तदान शिबिर यशस्वी केले. रक्तदात्याना संस्थे तर्फे ट्रॉफी व प्रमानपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून खालील दिन गाण्याचे प्रकाशन करण्यात आले. ” शिवनेरी किल्ल्यावर दैवत जन्मास आले ” ह्या गाण्याचे गायक हरीश सुतार स्वतः उपस्थित होते. त्यासोबतच ” माझा राजा ” ह्या गाण्याचे गायक आकाश खांजेकर स्वतः उपस्थित राहून व स्वतःहून हे गाणं म्हणत या गाण्याचे प्रकाशन केले. रक्तदात्यांनी व प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहाने या गाण्याचा स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
“सामाजिक भान राखुया, कर्तव्याला जागू या” हा संदेश देत रक्तदान शिबिरा बरोबर केम हॉस्पिटल व रोटो शुटो ह्या संस्थेच्या माध्यमातून अवयवदान शिबीर देखील ठेवण्यात आले होते. ह्या शिबिरा मध्ये १९ जणांनी देहदान, ९ जणांनी अवयवदान तर, २ जणांनी नेत्रदान करून हे शिबीर यशस्वी केले.
हे रक्तदान शिबिर पूर्ण व यशस्वी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा प्रवक्ते सचिन शिंदे, प्रभाग 22 चे खारटन रोड येथील प्रवीण खैरालिया सोबत अंकुश चिंडालिया, अजय चिंडालिया, अजय सिंग, तसेच बीजेपी पक्षाचे प्रभाग क्रमांक २२ चे विशाल वाघ, बीजेपी ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सारंग मेंढेकर हे सहभागी झाले होते. त्याचबरोबर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेविका पूजा वाघ, तसेच शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख ठाणे जिल्हा अध्यक्ष तसेच टेंभी नाका येथील शाखाप्रमुख निखिल बुडजडे व उपविभाग प्रमुख स्वानंद पवार, खारकळ आळी पोलिस लाईन शाखाप्रमुख नितेश पाटोळे, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष रमेश आँब्रे, ऍड, संतोष सूर्यराव, परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, हे उपस्थित होते. तसेच महागिरी कोळीवाडा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण तसेच उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश कोळी, पोलीस ठाणे श्वान पथकाचे शशिकांत यादव, अष्टविनायक मित्र मंडळ कळव्याचे अमित मंडलिक, प्रशांत मांजरेकर, मंगेश गुप्ता, मराठा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष धिरेंद्र शिंदे, संतोष पालांडे, सह्याद्री प्रतिष्ठान चे अनिकेत कडवं, निखिल राजणे, पंकज दांगट व इतर सदस्य, जेष्ठ समाजसेवक संतोष भोई, मंगेश जाधव , राजपुत संघाचे अध्यक्ष आर.के.पाटील हे उपस्थित होते.
हे शिबीर पूर्ण करण्यासाठी संस्थेचे राजेंद्र गोसावी, समीर डिके, विशाल पाटील, पुष्पा लोंढे, आरती गाढवे, वैभवी दाभोळकर, प्रीती सैल, मंगेश निकम, तृशांत फडतरे, निखिल सोनवणे, उत्कर्षा पाटील, अपर्णा आंग्रे ह्यांनी मेहनत घेऊन हे शिबिर यशस्वी केले.