पडघा विभागात धम्मपद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत,गौतम बुध्द अस्थिधातू कलश वंदनासाठी नागरिकांची मोठी गर्दी

भिवंडी

भिवंडी तालुक्यातील पडघा विभागात प्रथमच
तथागत भगवान गौतम बुध्द अस्थिधातू कलश वंदन व आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खु संघ थायलंड यांची भव्य धम्मपद यात्रा स्वागत समारंभ रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी भिवंडी तालुक्यातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांचा वतीने पडघा टोलनाका जवळील गोपाळास हॉटेल, मुंबई-नाशिक हायवे येथे बौद्ध धम्मपद यात्रेच्या स्वागतासाठी फुलांनी अक्षरशः सजला होता. पडघा विभागातील नागरिकांनी तथागत भगवान बुद्ध यांच्या अस्थीकलशाला वंदन करण्यासाठी नाशिक महामार्गावर ४ ते ७ किलोमीटरपर्यंत लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.यावेळी ठाणे जिल्हातून विविध क्षेत्रातील नागरिकांनी हजेरी लावली होती.

तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थी असलेला अस्थीकलश घेऊन थायलंड येथील पु.धम्मगुरु लॉंगफुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ११० बौद्ध भिक्खुसह तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी कलश पदयात्रेत जागतिक धर्मगुरू भंते तेप्रिवय यधिष्ठी, भंते लॉंगफुजी, भंते सोंगसेक फॅन्टफियन यांच्यासह अनेक बौद्ध भिक्खू उपस्थित होते.

थायलंड येथील ११० पुजनीय बौध्द भिक्खू संघ, धम्मपद यात्रेचे स्वागत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी धर्मगुरू भंते तेप्रिवय यधिष्ठी यांनी उपस्थित नागरिकांना धम्मदेसना दिली. यावेळी तर डॉ. सिध्दार्थ अंबिरे व धम्मदूत गगन मलिक,सिरीलक मैथेई यांनी मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभागातील तरुण कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. बिरो रिपोट अनिल गजरे भिवंडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *