दै. मुंबई मित्र दै. वृत्त मित्र व वास्ट मिडिया, अभिजीत राणे युथ फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये भिवंडीचे सुनील झळके यांना आपल्या प्रशासकीय, सामाजिक व पत्रकारितेतील क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मुंबई अचिवर्स एक्सलन्स अवॉर्ड 2023 प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईचा नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकताच पार पडला. हा अवॉर्ड सुनील झळके यांना अभिजीत युथ फाऊंडेशनचे संस्थापक विख्यात कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला.

सुनील झळके हे ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक सदस्य तसेच ठाणे पालघर आणि मुंबई जिल्ह्यातील आदिवासी लोकांना आर्थिक पुरवठा करून त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी आदिवासी सहकार मंच आपले सहकारी महादेव घाटाळ,अनंता पाटील, डॉक्टर अनंता पाटील, जयराम पाटील व तीनही जिल्ह्यातील त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने स्थापन करून आदिवासी लोकांना व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने आणि त्यांचे राहणीमान उंचावण्याच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून पतसंस्थाही स्थापन केलेली आहे, त्यामुळे झळके हे आपले प्रशासकीय काम सांभाळून समाजातील लोकांच्या विकासासाठी सहकार क्षेत्रातही त्यांनी सामाजिक व पत्रकारितेसह पाऊल ठेवलेले आहे ,त्यामुळे सुनील झळके यांनी केलेल्या कामाची फलश्रुती म्हणून मिळालेल्या या मुंबई अचिवर्स एक्सलन्स अवॉर्ड 2023 बद्दल त्यांचे समाजामध्ये सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. यापूर्वीही त्यांना नाट्य लेखनाबद्दल नाट्य दर्पण पुरस्कार आणि विविध लेखन स्पर्धेत पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सध्या सुनील झळके हे भिवंडी महानगरपालिकेमध्ये माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
