घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध कामे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी व भिवंडी शहरातील स्थानिक नागरिकांना याची माहिती होण्यासाठी आरोग्य स्वच्छता विभागामार्फत उपविधी तयार करण्यात आली असून ,सदर उपनिधीस मा.महासभा ठराव क्र,३ दि.२४/०७/२०१७ रोजीच्या मान्यतेनुसार उपविधीचे स्थानिक नागरिकांकडुन उल्लंघन झाल्यास उपविधीमधील दंडाच्या तरतुदी नुसार दंडाची कार्यवाही करणेसाठी भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेमार्फत मे.रेयान इंटरप्राईजेस ,अंबरनाथ या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर संस्थे मार्फत तीन सत्रांत दंडाची कार्यवाही करण्यात येणार आहे. या मध्ये प्रभाग समिती एक ते पाच निहाय प्रत्येकी पाच असे 25 कर्मचारी वर्गाचे पथक नियुक्त करण्यात आले असून, यामध्ये नियुक्त पथकास ओळखपत्र, गणवेश, ऑनलाईन डिजीटल चलन (पावती) इत्यादी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असुन दि.१०/०२/२०२३ पासुन उपविधीचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. दंडात्मक कार्यवाहीबाबत काही तक्रार किंवा आक्षेप असल्यास महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग येथे प्रत्यक्ष अथवा healthheadquarter@gmail.comया ई-मेलद्वारे संपर्क साधावा तसेच संबंधित प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी, प्रभाग आरोग्य निरिक्षक व आरोग्य निरिक्षक यांचे निदर्शनास आणून द्यावेत.
सदर संस्थेत उपविधीनुसार कामकाज करण्याचे मार्गदर्शन करताना श्री. दीपक झिंजाड उप-आयुक्त (आरोग्य), प्रिती गाडे रा. आयुक्त (आरोग्य) ,श्री. जे. एम. सोनवणे सार्व.आरोग्य अधिकारी व सदर संस्थेचे ३० कर्मचारी उपस्थित होते. यावेळी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओला व सुका कचरा विलगीकरण करणेकामी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन दीपक झिंजाड, उपयुक्त (आरोग्य)यांनी नागरिकांना केले आहे.बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS
