मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

भिवंडी



भिवंडी- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी भिवंडीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या वतीने जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय कोणार्क आर्केड येथे बनविण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन देखील प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आठवडाभर ही लोकोपयोगी सेवाभावी कामे सुरूच राहणार असून आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले असल्याची माहिती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्र रात्र भर जागून राज्यातील नागरिकांची सेवा करीत आहेत त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवाभावी कार्यक्रम आयोजित केली असून लोकसेवा आठवडा सर्वत्र राबविला जात असून जनसामान्यांना आवश्यक असलेले लोकोपयोगी कामे जिल्ह्यात सुरू असून आज या रुग्णवाहिकेचे लोकार्पण त्याचाच एक भाग आहे अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील यांनी दिली आहे. या कार्यक्रमा प्रसंगी आमदार शांताराम मोरे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सभापती सदस्य व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS भिवंडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *