भिवंडी:दि.७-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने भिवंडीत लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवारी अनगाव,वाडा,वालशिंद,व म्हसा या चार ठिकाणी असलेल्या गोशाळांना भेट देऊन प्रत्येकी ५९ हजार रुपये आर्थिक मदत केली.त्यांनतर शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय व कसारा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना फळ वाटप केले. त्यांनतर खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रम व काल्हेर येथील वृद्धाश्रमात भोजनदान तसेच अनगाव येथील अनाथाश्रमात भोजनदान केले.यावेळी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांनी ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे तत्व पळत आऊन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त हे सेवाभावी कामे हाती घेतली असून यापुढेही हि कार्य सुरूच राहतील अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS
