ठाण्यातील दिवा पूर्व परिसरात ओंकार नगर राहणाऱ्या एका ६० वर्षीय वयोवृद्ध विकृत नराधमाकडून दोन सख्या भहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे….
ठाण्यालगत दिवा परिसरातील ओकरा नगर येथील एका चाळीत राहणाऱ्या सख्या अल्पवयीन चिमुकल्यावर 60 वर्षी य नराधमाकडून लैगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यात ९ वर्षीय आणि ७ वर्षीय अशा एकाच घरातील दोन चिमुकल्या असुन. त्याच्यावर लैंकींग अत्याचार झाला आहे. …लैगिक अत्याचार झालेल्या शेजारी ६० वर्षीय नराधम राहत असुन….या दोघी बहिणींना खाऊ देण्याचे आमिष दाखवत आपल्या घरी अभ्यासाला बोलवायचे . याच संधीचा फायदा घेत या नराधमाने पहिले ९ वर्षीय चिमुकलीला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक चाळे करत असत. सोबत वारंवार घडत असलेला प्रकार चिमुकलींनी घरी आपल्या आईला सांगितलं आणि त्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चिमुकलींची आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात या ६० वर्षीय विकृत नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन मुंब्रा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुंब्रा पोलिसांनी या विकृत नराधमांविरुद्ध अल्पवयीन तथा बालकांसोबत लैंगिक अत्याचार, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केले आहेत. तसेच या विकृत नराधमाला पोलिसांनी तात्काळ अटक केली असुन . पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.बिरो रिपोट गावकरी टुडे ठाणे मुब्रा.