भिवंडी:दि.७-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने भिवंडीत लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवार व गुरुवार असे दोन दिवस विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.बुधवारी खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रम व काल्हेर येथील वृद्धाश्रमात भोजनदान तसेच अनगाव येथील अनाथाश्रमात भोजनदान करण्यात येणार आहे.त्यांनतर अनगाव,वाडा,वालशिंद,व म्हसा या चार ठिकाणी असलेल्या गोशाळांना प्रत्येकी ५९ हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येणार असून शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय व कसारा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना फळ वाटप करण्यात येणार आहे. त्यांनतर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या वाढ दिवसादिवशी भिवंडीतील कोणार्क आर्केड येथे सकाळी अकरा वाजता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन होणार असून यावेळी जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी ऑक्सिजन युक्त सुसज्ज कार्डीक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.
