*उन्हाळा आणि घाम हे ठरलेलं समीकरण आहे. उन्हाळयात घाम येणे ही सर्वात मोठी समस्यां असते. घाम येऊ नये म्हणून अनेक उपाय केले जातात. एसी हा तर आजकाल वापरला जाणारा सर्वात महागडा पर्याय आहे, परंतु घामापुढे एसीची काय किमंत. गाडी, घर, ऑफिस आजकाल सर्वत्र एसी लावले जातात. घामापासून वाचण्यासाठी एसी, फॅन यांचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. परंतु आपण कधी विचार केला आहे का की, घाम का येतो ? घाम येण्याचे फायदे काय आहेत? आज आपण घाम येण्याचे फायदे पाहणार आहेत. हे फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल. उन्हाळ्यात घाम येणे एक सामान्य गोष्ट आहे, त्यामुळे तुम्हाला घाम येणे गरजेचे आहे. घाम येणे हे कोणत्या रोगांचे लक्षण नसून घाम येणे हे एक चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. पण प्रमाणाबाहेर जर घाम येत असेल तर मात्र योग्य वेळी डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे. घाम आल्यामुळे आपल्या शरीरास त्यांचे खूप फायदे होतात. घाम आल्यामुळे आपले शरीर स्वछ होते. आपल्या शरीरातील हानीकरक गोष्टी शरीरा बाहेर टाकल्या जातात.

*घाम येणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीर या प्रक्रियेचा वापर करते. या प्रक्रियेद्वारे शरीरातील विविध रसायने आणि हार्मोन्स यांचे संतुलन कायम ठेवले जाते. मात्र, अधिक घाम येणे हे आरोग्य ठीक नसल्याचे निदर्शक मानले जाते शरीरातून घाम आलाच पाहिजे. घाम ही शरीराचे संरक्षण करणारी नैसर्गिक पद्धती आहे. घाम येण्यामुळे शरीर थंड राहते. शरीराचे उष्णतेपासून संरक्षण होते. तसेच वेगवेगळ्या संसर्गांपासून शरीराचा बचाव होतो. जेव्हा घाम येत नाही तेव्हा ब्लड प्रेशर वाढते या बरोबरच ताप देखील येतो.*
*वजन कमी करण्यासाठी घाम जरुरी. सध्याच्या काळात वाढते वजन ही फार मोठी शाररिक समस्या आहे. वजन वाढल्यामुळे अनेक शाररीक व्याधी सुरु होतात. त्यामुळे आजकाल वजन कमी करण्यासाठी कित्येक तास जिममध्ये वर्क आऊट केले जाते. वर्क आऊट करून वजन कमी केले जाते. जेव्हा वर्क करतो तेव्हा भरपूर घाम येतो तेव्हा शरीरातील कॅलरी मोठ्या प्रमाणत बर्न होतात व त्यामुळे वजन कमी होते. जेव्हा -जेव्हा शरीरातील कॅलरी बर्न होतात तेव्हा त्या घामावाटे बाहेर टाकल्या जातात.*
*डिटॉक्स- नियमित घामामुळे शरीरातील हानिकारक द्रव्य पदार्थ बाहेर टाकले जातात. आपल्या शरीरातून मोठं व अल्कोहल बाहेर टाकण्यासाठी देखील घाम येणे जरुरी आहे. जेव्हा आपले शरीर डिटॉक्स होते तेव्हा आपल्या शरीरातील डेड म्हणजेच मृत पेशी बाहेर टाकल्या जातात. त्वचेला एक वेगळाच निखार येतो.*
*बैलेंसिंग टेंपरेचर: म्हणजेच तापमान नियंत्रण– घामामुळे आपल्या शरीरातील तापमानाची पातळी राखली जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराचे तापमान सतत बदलले जाते. ज्यामुळे आपल्याला कधी -कधी खूप अस्वस्थ वाटते. घाम येण्यामुळे शरीर थंड राहते. शरीराचे उष्णतेपासून संरक्षण होते. तसेच वेगवेगळ्या संसर्गांपासून शरीराचा बचाव होतो. शरीर गरम झाल्यावर शरीरातून घाम येतो. घामामध्ये अँटी मायक्रोबियल पेप्टाथाईड नावाचा पदार्थ असतो. हा पदार्थ क्षयरोगासारख्या असाध्य व्याधीशी लढताना उपयोगी ठरतो.*