एका आठवड्यात बारामतीतील दोन बेवारस मनोरुग्ण महिलांना मिळाला हक्काचा निवारा .

महाराष्ट्र

गावंकरी Today News बारामती : (प्रतिनिधी : ब्युरो रिपोर्टर, रियाज पठाण.) बारामती – भिगवण रस्त्याच्या नजिक वंजारवाडी येथे वयोवृद्ध अंदाजे ५५ वयोगटातील एक महिला बेवारस स्थितीत वावरत असल्याचे एक फोन आल्यानंतर, गोखळी ता.फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते राजू गावडे, रमेश गावडे,पै.दिपक चव्हाण यांनी त्वरित भेटून ,सदर महिलेस सात-आठ महिन्यांपूर्वी आधार देण्याचा प्रयत्न केला असता.त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद न देता पसार झाले.त्यांच्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची भाषा समजत नव्हती, बहुतेक त्या तामिळ किंवा आंध्र प्रदेशातील असतील,असा अंदाज आहे.त्यांच्या हाव -भावावरुन लोक मला दगडी मारतात, असा सांगण्याचा प्रयत्न करत असत.या सर्व प्रकारची माहिती घेऊन त्वरित बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला संपर्क करून,सदर घटनेची माहिती देऊन सहकार्य करण्याची विनंती केली असता, सहाय्यक पोलिस निरीक्षक लंगुटे साहेब यांनी भेट घेऊन सविस्तर माहिती घेण्यातआली.लंगुटे साहेब यांनी त्वरित चौधरी मॅडम, गायकवाड साहेब यांचे सहकार्याने तत्काळ पुणे येथील” आसरा अनाथांचा हक्काचा निवारा संस्थेच्या व्यवस्थापक सौ. स्वातीताई डिंबळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून,स्वातीताई डिंबळे यांनी सदर मनोरुग्ण बेवारस महिलेला सांभाळण्यासाठीचा शब्द दिला.याकामी सामाजिक कार्यकर्ते रमेश गावडे,पै. दिपक चव्हाण, आबासाहेब चौधर यांचे सहकार्य लाभले .
एका आठवड्यात बारामती शहरातील दोन बेवारस स्थितीत जगण्याची धडपड करणाऱ्या महिलांना हक्काचा निवारा मिळवून देण्यात यश मिळाले. याचे मोठे समाधान वाटते असे सामाजिक कार्यकर्ते राजू गावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *