भिवंडी प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात मदत होण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी भिवंडी तालुक्यातील शारदा क्लासेस पडघा व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आर. के. पालवी पडघा पावली शाळा येथे विज्ञान व सामाजिक विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी पडघा परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून आठवी,नववी, दहावीचे विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
प्रश्नमंजुषा स्पर्धेचे परीक्षण माजी मुख्याध्यापक रावसाहेब कुमावत यांनी केले. यावेळी प्रा. निवृत्ती मगर ,कवी मिलिंद जाधव उपस्थित होते. यावेळी कवी मिलिंद जाधव यांनी”आई मला शाळेला जायचं हाय” ही ,कविता सादर केली.
आठवीच्या गटात आर . के पालवी इंग्लिश स्कूल प्रथम तर आदर्श विद्यालय कुरुंद शाळेने दृतिय क्रमांक मिळविला.नववीच्या गटात आर . के पालवी इंग्लिश स्कूल प्रथम तर शारदा विद्यालय पडघे यांनी दृतिय क्रमांक मिळविला. दहावीच्या गटात आर . के पालवी इंग्लिश स्कूलने प्रथम तर शारदा विद्यालय पडघे यांनी दृतिय क्रमांक मिळविला. विजेत्या शाळांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.तर सहभागी विद्यार्थ्यांना शारदा क्लासेस पडघा व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पंकज भोईर, सतिश प्रजापती , विलास भोईर , जितेंद्र जाधव यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी जाधव,योजना भंडारी, ऋषाली कथोरे यांनी केले.
