शहर स्वच्छतेसाठी प्रथम मनातील विचारांची स्वच्छता अत्यंत महत्वाची
– उप-आयुक्त दिपक झिंजाड ..
शहरातील स्वच्छतेच्या संदर्भात प्रशासन, नागरीक आणि समाजसेवी संस्था यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळेच आपले शहर आपला देश स्वच्छतेत सफल होणार आहे परंतु, स्वच्छतेबाबत आपण सर्वांनी सर्वप्रथम मनातील अच्छतेच्या विचारांची घाण साफ करणे अत्यंत महत्वाचे आहे. तरच शहर स्वच्छता व देशांमध्ये स्वच्छतेचे चित्र निर्माण होईल. असे मत उप- आयुक्त, दिपक झिंजाड यांनी महानगरपालिका व हेमा फाउंडेशन यांच्या विद्यागाने आयोजित स्व. राजय्या गाजेंगी सांस्कृतिक • हॉल येथे केलेल्या स्वच्छता स्पर्धांचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्गार काढले. यावेळी हेमा फाऊंडेशनच्या ट्रस्टी शिप्रा कात्रा, शैक्षणिक संचालक विजयम रवी, उप आयुक्त प्रणाली घोंगे इ.ऊपस्थित होते.
उप-आयुक्त झिंजाड पुढे म्हटले की, स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत स्वच्छ भारत अभियानातून आणि अशा स्पर्धांमधून शहराचे आणि पर्यायाने देशाचे रूप ब-याच प्रमाणांत बदलत गेलंय. हा बदल होत असतांना स्वच्छतेची जबाबदारी ही निव्वळ प्रशासनाचीच नव्हे तर सर्व नागरीकांचीही आहे, त्यामुळे स्वच्छता हा विषय प्रशासनासह नागरीक आणि शहराचा केंद्रबिंदू ठरावा. असेही त्यांनी शेवटी म्हटले.
याप्रसंगी शैक्षणिक संचालक विजयम रवी म्हणाल्या की, शहर, आसपासचा परिसर स्वच्छतेसाठी आपणां सर्वांना काळजी आणि सवय लाऊन घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे झिंजाड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बाहेरचा कचरा कधीही साफ होईल, प्रथम मनातल्या कच-यांची विल्हेवाट लावणं आपल्यादृष्टीने काळाची गरज आहे, ही गरज ओळखूनच हेमा फाऊंडेशन आपल्या शहरातील स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या सहकार्याने स्वच्छतेच्या बाबतीत चांगल्या प्रकारे काम करणार आहे आणि स्वच्छतेबाबतचे हे विचार सर्वांनी मनात रुजवाचे, आता स्वच्छतेसंदर्भात दृष्टीकोनही बदलायला हवा.
फाऊंडेशनच्या ट्रस्टी शिप्रा कात्रा यांनी या उद्घानप्रसंगी सांगितले . सद्या भिवंडी शहरातील मनपा व खाजगी शाळांमध्ये शाळा स्वच्छता, परिसर आणि नागरीकांमध्ये स्वच्छता इ.बाबत जनजागृती करीत विविध स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा – २०२३ चे आयोजन १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या स्वच्छता सप्ताहातून केलेले आहे. यामध्ये माझी शाळा, स्वच्छ शाळा आणि माझा परिसर स्वच्छ परिसर अशा कार्यक्रमांतर्गत साध्य केले जाणार आहे. त्यासाठी ऊपस्थित शिक्षक, शिक्षिका, नागरीक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणांवर सहभाग घेणे गरजेचे आहे.
मन कुमार यांनी या स्वच्छ स्पर्धांचे निकष आणि कार्यवाहीबाबतची माहिती देऊन, यामाध्यमातून संबंधित
समितीच्या परिक्षणाअंती विजेत्यांना प्रथम क्रमांक रु.३१,०००/-, व्दितीय क्रमांक रु.२१,०००/-, तृतीय क्रमांक रु.१५,०००/- चौथे क्रमांक रु.११,०००/- व पाचवे क्रमांकास रु.५,०००/- अशा रोख स्वरुपांत पारितोषिक प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सदर स्वच्छता उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्र संचलन जनसंपर्क अधिकारी सुनिल झळके यांनी केले. याप्रसंगी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे, रमेश थोरात तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षण विभागागातील शिक्षे, शिक्षिका, सीआरसी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने हजर होते.
बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS
